तारक मेहतामधील दयाबेनने केले होते बी-ग्रेड चित्रपटात काम; बोल्डनेसची सर्वच हद्द केली होती पार

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिकांमधले एक नाव म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशात महत्वाच्या भुमिकेत असणाऱ्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानी या मालिकेतुन बाहेर पडल्या होत्या, पण त्यांना या शोमुळे एक वेगळी ओळख मिळाली होती.

पण दिशा वकानी यांनी फक्त तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतच काम केले नाहीये, तर त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही, तर बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

जोधा अकबर – जोधा अकबर या चित्रपटात ऐश्वर्या राय नेहमी काही दासींसोबत दिसतेय. या चित्रपटामध्ये दिशा वकानी आपल्याला दासी झालेली दिसते. तिने या चित्रपटात माधवीची भुमिका निभावली होती.

लव्हस्टोरी २०५० – प्रियंका चोपडा आणि हरमन बावेजा यांचा लव्हस्टोरी २०५० हा चित्रपट आला होता. हा चित्रपट हिट ठरला नव्हता, पण त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. या चित्रपटात दिशा वकानी पण दिसून आली होती. या चित्रपटामध्ये तिने नोकराणीची भुमिका निभावली होती. विशेष म्हणजे ज्यावर्षी हा चित्रपट आला होता, त्याचवर्षी तिने तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भुमिका निभावण्यास सुरुवात केली होती.

मंगल पांडे – आमिर खानच्या मंगल पांडे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप टाकली होती. हा चित्रपट सुपरहीट ठरला होता. तसेच या चित्रपटातही आपल्याला दिशा वकानी दिसून आली होती. या चित्रपटामध्ये तिने एका वेश्याची भुमिका निभावली होती.

देवदास- तसेच संजय लीला भन्साळी यांचा प्रसिद्ध चित्रपट देवदासमध्येही दिशा दिसून आली होती. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधूरी दिक्षित असलेल्या या चित्रपटामध्ये दिशाने सखीची भुमिका निभावली होती.

कॉ कंपनी – अनुपम खेरच्या कॉ कंपनी या चित्रपटामध्येही दिशाने एक भुमिका निभावली होती. या चित्रपटाची निर्माता एकता कपुर होती. या चित्रपटात मिथून चक्रवर्ती, तुषार कपुर होते. या चित्रपटामध्ये दिशाने एका विधवा महिलेची भुमिका निभावली होती.

कमसिन: द अनटच्ड- दिशाने वकानी १९९७ मध्ये आलेल्या कमसिन: द अनटच्डमध्ये प्रमुख भुमिकेत दिसून आली होती. ही फिल्म एक हिंदी बी ग्रेड ड्रामा फिल्म होती. या फिल्ममध्ये दिशा वकानीने कॉलेजमधल्या विद्यार्थीनीची भुमिका निभावली होती.

महत्वाच्या बातम्या-

अजय देवगणने खरेदी केला अलिशान बंगला, पण बंगला खरेदीसाठी घेतले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज
तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रुपये पगार, आकडा वाचून अवाक व्हाल
दिल्लीत शरद पवार यांच्या घरी नेत्यांची खलबत, संध्याकाळी १५ मोठ्या नेत्यांची बैठक, चर्चांना उधाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.