‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; होणाऱ्या नवऱ्याला आहे एक मुलगी

मुंबई | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा ही लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत दिया मिर्झा विवाह बंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागच्यावर्षीपासून दिया वैभव रेखीला डेट करत असल्याची चर्चा होती.

तसेच माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूमुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनदरम्यान दीया आणि वैभव यांच्यातील मैत्री वाढली. दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतित करू लागले. आता अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, दीया मिर्झा १५ फेब्रुवारीला वैभव रेखीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

दीयाचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर दोघे ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये सोशल मीडियावर विभक्त होत असल्याचे सांगितले होते. तसेच वैभव रेखी मुंबईतील बिझनेसमन आणि इन्व्हेस्टर आहे. तसेच प्रसिद्ध योगा इंस्ट्रक्टर सुनैना रेखीचा नवरा होता. सुनैना आणि वैभवला एक मुलगीदेखील आहे.

दरम्यान, येत्या १५ फेब्रुवारीला दिया मिर्झा आणि वैभव रेखी विवाहबद्ध होतील. हे लग्न अगदी खासगी ठिकाणी ठेवली जाणार आहे. अत्यंत साधेपणाने घरच्या घरी हे लग्न होईल, असे माध्यमांनी म्हटले आहे. फार निवडक लोक या विवाह सोहळयाला उपस्थित असतील.

महत्त्वाच्या बातम्या
‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का
…म्हणून ‘त्या’ बस कंडक्टरनं सोशल मीडियावर विकायला काढली स्वत:ची किडनी
‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’, भूषणसिंह होळकरांची टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.