वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने केली शस्त्रक्रिया; गमवावा लागला जीव

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार बॉलीवूडमध्ये देखील खुप प्रसिद्ध आहेत. जसे की, प्रभास, अल्लू अर्जून, राम चरण फक्त अभिनेतेच नाही तर अभिनेत्री देखील तेवढ्या प्रसिद्ध आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे आरती अग्रवाल.

आरती आग्रवाल हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील खुप प्रसिद्ध नाव आहे. साऊथच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा समावेश होतो. तिच्या सुंदरतेवर आणि अभिनयावर अनेक लोकं फिदा होते. आजही तिचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आरती आज आपल्यामध्ये नाहीत.

हे वाचून अनेकांना धक्का बसेल. पण ही गोष्ट खरी आहे. खुप कमी वयात आरती हे जर सोडून गेल्या. अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे त्यांचा मृत्यू बारीक होण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेमूळे झाला होता.

त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंर अनेकांना धक्का बसला होता. कारण त्यांचे वय फक्त ३१ वर्ष होते. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना. त्यांचे वजन वाढले होते. त्यामूळे त्यांना काम मिळणे कमी होऊ लागले. करिअर नीट करायचे असेल तर त्यांना वजन कमी करणे खुप गरजेचे होते.

वजन कमी करण्यासाठी आरतीने यांनी अनेक प्रयत्न केले. रोज योगा आणि व्यायाम केला. पण त्यांना यश मिळत नव्हते. त्यांना लवकर वजन कमी करायचे होते. म्हणून त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करुन वजन कमी करायचे असे त्यांनी ठरवले.

त्यांनी वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन नावाची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया अमेरिकेत झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हे ऐकल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना खुप मोठा धक्का बसला होता.

बारीक होण्यासाठी केलेली ही शस्त्रक्रिया आरतीला खुप महागात पडली. त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. वाढलेल्या वजनामूळे त्यांना खुप कमी चित्रपट मिळत होते. वजन कमी करायला गेल्यानंतर त्यांना जीन गमवावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या –
कटप्पाने बाहूबलीला का मारले ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘या’ मराठी अभिनेत्याला लाच देण्याचा प्रयत्न केला पण…
कपिल शर्मा फेम सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल; वाचा संपुर्ण प्रकरण
काय सांगता! ट्विंकल खन्नाला लहानपणी होती मिशी; मित्र करण जोहरचा खुलास
विवाहीत टेनिस खेळाडू महेश भुपत्तीवर फिदा झाली होती लारा दत्ता; वाचा त्यांची लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.