अजय देवगनसाठी ‘या’ अभिनेत्रीने कापून घेतली होती हाताची नस

बॉलीवूडच्या सर्वात शांत आणि प्रभावशाली अभिनेत्यांमध्ये अजय देवगनचे नाव येते. ९० च्या दशकात अनेक अभिनेते होते. पण खुप कमी अभिनेते आजही काम करत आहेत. पण आजही अजय देवगन बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.

अजय देवगनला बॉलीवूडचा सर्वात शांत अभिनेता समजले जाते. तो नेहमीच त्याच्या अभिनयाने लोकांची मने जिंकून घेतो. पण त्याच्या मनावर मात्र काजोल राज्य करते. अजय देवगन आणि काजोलच्या लग्नाला वीसपेक्षा झाली वर्ष आहेत. पण तरीही ते दोघे आजही आनंदाने सुखाचा संसार करत आहेत.

तुम्हाला माहिती आहे का? काजोलला भेटण्यापूर्वी अजय देवगनने दोन अभिनेत्रींना डेट केले आहे. पण लग्न मात्र काजोलसोबत केले. ‘हालचल’ चित्रपटाच्या शुटिंग या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

जाणून घेऊया बॉलीवूडच्या कोणत्या दोन टॉपच्या अभिनेत्रीसोबत अजय देवगनचे अफेअर होते. पहिली अभिनेत्री आहे बॉलीवूडची मस्त मस्त गर्ल रविना टंडन. करिअरच्या सुरुवातीला अजय देवगन रविना टंडनला डेट करत होता.

रविना अजय देवगनच्या प्रेमात पागल झाली होती. ‘दिलवाले’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी हे दोघे एकमेकांसोबत टाईम घालवायचे. त्यानंतर देखील त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. शुटिंग वेळेस या दोघांची जवळीक खुप जास्त वाढली होती.

रविना टंडनला अजय देवगनसोबत लग्न करायचे होते. त्यासाठी ती करिअर देखील सोडायला तयार होती. एवढेचं नाही तर एकदा तिने अजयसाठी स्वतः चा हात कापून घेतला होता. हे सगळे बघून अजय देवगनने रविनापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.

रविनापासून लांब गेल्यानंतर अजय देवगनच्या आयुष्यात करिष्मा कपूरची एन्ट्री झाली. अजयला करिष्मा आवडायला लागली होती. तर करिष्मा कपूर मात्र अजय देवगनवर वेड्यासारखी प्रेम करू लागली होती. करिष्मा कपूर आणि अजय देवगनबद्दल ज्यावेळी रविना टंडनला समजले त्यावेळी तिला खुप राग आला.

असे बोलले जाते की, अजय देवगनमूळेच करिष्मा कपूर आणि रविना टंडनमध्ये भांडण सुरू झाली होती. आजही त्या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत. कारण करिष्मा कपूर आणि रविना टंडन दोघीही अजय देवगनवर प्रेम करत होत्या. पण अजय देवगनचे हृदय मात्र काजोलने चोरले होते.

‘हालचाल’ चित्रपटाच्या शुटिंग वेळी दोघांची मैत्री झाली. त्यानंतर काजोलने अजय देवगनला लग्नासाठी प्रोपोज केले आणि त्याने होकार दिला. अजय देवगनचा स्वभाव खुप शांत आहे. तर काजोल मात्र खुप बडबडी आहे. पण तरीही हे दोघे आजही एकत्र आहेत. अजय खुप शांत स्वभावाचा आहे म्हणून काजोलने त्याला लग्नासाठी प्रोपोज केले होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.