वेब सीरिजच्या नावाखाली करायची अ’श्लिल व्हीडिओ शुट; बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला अटक

हिंदी, तेलगू सिनेमांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या प्रसिध्द अभिनेत्रीला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. गहना वशिष्ठ असं त्या अभिनेत्रीचं नाव असून तिच्या सोबत दोन अभिनेत्यांना आणि दोन तरूणींना पोलिसांनी अटक केली आहे.

मिस आशिया बिकनी स्पर्धा जिंकणाऱ्या गहना वशिष्ठने शॉर्ट फिल्म, आणि वेब सीरिज शुटिंगच्या नावाखाली मालाडमधील मड ग्रीन पार्क येथे प्रॉडक्शन हाउस उभारलं होतं. या ठिकानी जबरदस्तीने तरूणींकडून अश्लिल व्हीडिओचे शुटींग करून तिच्या वेबसाईटवर अपलोड करत असत. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या ठिकानी धाड मारत पाच जणांना अटक केली आहे.

मुंबई सारख्या मोठ्या शहरात अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी आलेल्या तरूणींच्या असाहय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने पॉर्न व्हीडिओ बनवून घेतले जात होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कारवाई करत यांचा पर्दाफाश केला आहे. या ठिकानाहून पोलिसांनी लॅपटॉप, मेमरी कार्ड, कॅमेरे, मोबाईल्स जप्त केले आहेत आतापर्यंत तिने ८७ अश्लिल व्हीडिओ बनवल्या असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई पोलिस आज अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि इतर आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत. तिची चौकशी करून तिच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

कोन आहे गहना वशिष्ठ

गहना वशिष्ठचं खरं नाव वंदना तिवारी आहे. तिला लहानपणापासून अभिनयाची, मॉडलिंगची आवड होती. ती २०१२ साली मिस इंडिया बिकिनी स्पर्धेमध्ये विजयी झाली होती. पब्लिसिटी स्टंट केल्याने तिला लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं आहे. स्टार प्लस चॅनेलवरील ‘बहनें’ मालिकेत तिने काम केले होते.
म्हत्वाच्या बातम्या-
मानसी नाईकने पती प्रदीप रावांसाठी घेतला खास उखाणा; वाचून तुम्हाला वाटेल कौतुक
सात पिढ्या बसून खातील इतकं कमवलयं, तर घाबरता कशाला?”, नसीरूद्दीन शाहांनी बॉलिवूडला सुनावलं
रणविर शौरीनं गाण्यातून साधला रिहानावर निशाणा; ‘रिहाना तो बहाना है..पप्पू को PM बनाना है’
बाबो! रिलीजच्या आधीच ‘या’ चित्रपटाने कमवले ३४८ करोड, बाहुबलीचाही रेकॉर्ड मोडला; पाहा ट्रेलर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.