सोनी मराठी(Sony Marathi) वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाच्या नवीन भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता या कार्यक्रमामध्ये एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. या अभिनेत्रीचे नाव अपूर्वा नेमळेकर आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने यापूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये शेवंताची भूमिका केली होती.(actress apurva nemlekar entry in hasyjatra show)
या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘हास्य जत्रा’ या कार्यक्रमात दिसणार आहे. नुकताच या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. प्रेक्षक देखील या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘हास्य जत्रा’ कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे.
हा प्रोमो शेअर करताना सोनी मराठी वाहिनीने म्हंटल आहे की, “हास्यजत्रेच्या मंचावर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर करणार हास्याचा धमाका! पाहा, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा!’ गुरु-शनि.., रात्री ९ वा. फक्त सोनी मराठीवर!” अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अचानक सोडली होती. त्यानंतर अपूर्वा नेमळेकर हीने अनेक मालिकांमध्ये लहान भूमिका केल्या होत्या.
‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने ‘राणी चेन्नमा’ ही भूमिका साकारली होती. पण ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमामध्ये अपूर्वा नवीन रूपात दिसणार आहे. आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर कॉमेडी करणार आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते.
तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका अचानक सोडली होती. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीचं नाव चांगलचं चर्चेत आलं होतं. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या सेटवर काही कलाकारांकडून तिला चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जात होती, असे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पोस्टमध्ये म्हंटले होते. आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हास्यजत्रा या कार्यक्रमात कॉमेडी करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. हा भाग या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“कुठल्याही मंत्र्याने किंवा आमदाराने पैशांचा घोटाळा केल्यास थेट तुरुंगात टाकण्यात येईल”
असा हार आयुष्यात कधी घातला नाही पण.., क्रेननं हार घातल्यानंतर अजितदादांचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला
आमच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा आमदाराने पैशांचा घोटाळा केला तर.., अरविंद केजरीवाल यांचा इशारा