Share

बेडरूममध्ये अभिनेत्री आम्रपाली दुबेने केले ‘हे’ कृत्य, अभिनेता देखील झाला बेभान

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांसोबतच सध्या म्युझिक व्हिडीओजचा खूप ट्रेंड आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारचे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होत आहेत. यादरम्यान भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे आणि अभिनेता प्रदीप पांडे चिंटू यांचे नवीन रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. या रोमँटिक गाण्यामध्ये दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.(Actress Amrapali Dubey  ‘this’ in the bedroom, the actor also became unconscious)

या व्हिडिओमध्ये दोघेही बेडरूममध्ये रोमान्स करताना दिसत आहेत. हे रोमँटिक गाणे अभिनेता प्रदीपने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. ‘जरा तवे देहिया’ असे या रोमँटिक गाण्याचे बोल आहेत. एमएमएस स्कँडलनंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या शिल्पी राज आणि विजय चौहान यांनी हे गाणे गायले आहे.

हे रोमँटिक गाणे श्याम देहाती यांनी लिहिले असून रजनीश मिश्रा यांनी संगीत दिले आहे. या गाण्यामध्ये भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हीने गुलाबी रंगाचा टॉप आणि पांढरे शॉर्ट्स परिधान केले आहेत. या गाण्यामध्ये अभिनेत्री आम्रपाली दुबे अभिनेता प्रदीप पांडे चिंटूला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

या गाण्यामध्ये पार्श्वभूमीत दिसणारी बेडरूम गुलाबी रंगाने सजवण्यात आली आहे. प्रदीपने पोस्ट केलेल्या या गाण्यावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हंटले आहे की, “आग लावली या गाण्याने.” तसे दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट करत म्हंटले की, “गाणे पाहिल्यानंतर आजूबाजूला गुलाबी-गुलाबी दिसत आहे.”

आणखी एका व्यक्तीने कमेंट करत म्हंटले आहे की, “हा खूप धोकादायक व्हिडिओ आहे.” अनेकांनी या गाण्याचे कौतुक केले आहे. या गाण्यामधील आम्रपाली दुबे आणि प्रदीप पांडे चिंटू यांच्यामधील केमिस्ट्री पाहून अनेकांनी हृदय आणि आग लावणारे इमोजी शेअर केले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या गाण्याला लाइक केले आहे.

आम्रपाली दुबे ही भोजपुरी इंडस्ट्रीची सुपरस्टार आहे. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्री आम्रपाली दुबे हीचे दिनेश लाल यादव निरहुआसोबत अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरु आहेत. निरहुआ आधीच विवाहित आहे. दोघांनीही या अफेअरवर कधीही भाष्य केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या :-
९०० करोड कमावणाऱ्या ‘या’ चित्रपटाने सलमान खानला बनवले बाहुबली, फक्त दोन चित्रपट झाले फ्लॉप
भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेने मंदिराला दान केले लाखो रुपये, सोशल मीडियावर होतंय कौतुक
आमचे जीएसटीचे ३६ हजार कोटी द्या, सांगाल तो टॅक्स गायब करतो; ठाकरें पाठोपाठ राष्ट्रवादीही गरजली

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now