‘मकडी’ चित्रपटातील अभिनेत्रीने केले स्वीकार; म्हणाली, मी पैशांसाठी देहविक्री करत होते पण नंतर मात्र….

आज ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलणार आहोत. तिने वयाच्या दहाव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. पण वयाच्या २४ व्या वर्षी ती खुप मोठ्या संकटात अडकली होती. त्यामूळे तिचे करिअर पुर्णपणे खराब झाले होते. पण तरीही तिने हार मानली नाही. ती इंडस्ट्रीमध्ये मेहनत करत राहीली.

या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता प्रसाद बासू. ज्या पद्धतीने श्वेताने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. असे बोलले जात होते की, पुढे जाऊन श्वेता बॉलीवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री होऊ शकते. पण तसे झाले नाही. श्वेताच्या करिअरची सुरुवात एका मोठ्या अपघाताने झाली.

श्वेताचे वडील इंजिनिअर आहेत. तर आई शिक्षिका आहे. पण दोघांनाही कलेची आवड होती. कामासोबतच तिचे वडील नाटकांमध्ये काम करायचे. तर आईला लिहीण्याची आवड होती. त्यासोबतच संगीताची आवड होती. म्हणून घरामध्ये लहानपणापासूनच कलेचे वातावरण होते.

श्वेता चार वर्षांची होती. त्यावेळी तिचे कुटूंब मुंबईला स्थालांतरित झाले. मुंबईला आल्यानंतर श्वेताचे आई वडील अनेक वेळा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामासाठी यायचे. एकदा ते एका चित्रपटाच्या ऑडीशनसाठी आले होते. त्यावेळी ते श्वेतालासोबत घेऊन गेले.

श्वेताला एका चित्रपटासाठी ऑडीशन देण्यास सांगितले. तिने ऑडीशन दिले आणि तिची निवड झाली. श्वेता त्यावेळी फक्त दहा वर्षांची होती. दहाव्या वर्षी तिने ‘मक्कडी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. पहील्याच चित्रपटासाठी श्वेताला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या चित्रपटानंतर दहा वर्षाची श्वेता रातोरात स्टार झाली होती. तिने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये काम केले. कहाणी घर घर की, करिश्मा का करिश्मा अशा मालिकांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केले. त्यासोबतच तिने ‘इकबाल’ चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटातील तिच्या भुमिकेचे आणि अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले.

श्वेताने लहानपणीच आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. त्यामूळे ती मोठी झाल्यानंतर उत्तम अभिनेत्री होईल असे बोलले जात होते. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये बालकलाकरा म्हणून काम केल्यानंतर श्वेताने अभ्यासावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती अनेक वर्ष अभिनय क्षेत्रापासून लांब होती.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर श्वेताने अभिनयात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने पत्रकार म्हणून काम केले. अनेक मोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर तिने साऊथ चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. ती काही दिवसांमध्येच टॉपची अभिनेत्री होईल असे बोलले जात होते. पण ही गोष्ट होऊ शकली नाही.

करिअरच्या सुरुवातीलाच श्वेता एका सेक्स रॅकेटमध्ये अडकली. या गोष्टीने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता. सप्टेंबर २०१४ मध्ये एक बातमी आली होती. मक्कडी चित्रपटातील अभिनेत्री श्वेताला हैद्राबादच्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती.

या बातमीने सगळ्या देशाला धक्का बसला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेताला एका सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर श्वेता म्हणाली होती की, ‘फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींसाठी ही नवीन गोष्ट नाही. मी माझ्या आयूष्यात अनेक चुकीचे निर्णय घेलते होते. त्यामूळे माझे आर्थिक नुकसान झाले होते. मला पैशाची गरज होती. म्हणून मी निर्णय घेतला’.

श्वेताच्या या व्यक्तव्यामूळे सर्वांनाच धक्का बसला होती. तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. या कालावधीमध्ये बॉलीवूडमधून श्वेता सपोर्ट मिळाला. अनेक मोठ्या अभिनेत्रींनी श्वेताला सपोर्ट केला होता. दोन महिने श्वेता रिहॅब सेंटरमध्ये होती.

रिहॅब सेंटरमधून परत आल्यानंतर श्वेताने तिचे वक्तव्य बदलले. ती म्हणाली की, ‘मी तसे कोणतेही वक्तव्य केले नव्हते. मिडीयाने माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या होत्या’. बॉलीवूडमधून श्वेता खुप सपोर्ट मिळाला. त्यामुळे तिने परत एकदा चित्रपटांमध्ये काम देण्यात आले.

एवढ्या मोठ्या घटनेनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणे सोपे नव्हते. पण तिने हार मानली नाही. श्वेताने जेलमधून परत आल्यानंतर अनेक प्रोडक्शन हाऊससाठी काम केले. त्यासोबतच तिने अनेक टेलिव्हिजनवर ‘चंद्रनंदनी’ मालिकेत काम केले.

बॉलीवूडमध्ये तिने बद्रीनाथ की दुल्हनिया चित्रपटातून कमबॅक केला. श्वेताच्या उत्तम अभिनय कौशल्याने तिला इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस चांगले काम मिळत गेले. सिरीयस मॅन, हाय, मर्द को दर्द नही होता,शुक्राणू, हॉस्टेजस अशा अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले. आज श्वेता बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांची पहीली पसंत आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्री झाली होती घरेलू हिंसाचाराची शिकार; स्वत: केला होता ‘हा’ मोठा खुलासा

अमृता सिंग गेल्या पंधरा वर्षांपासून आहे सिंगल; जाणून घ्या कारण

पहा मराठमोळ्या अलका कुबलच्या नवऱ्याचे फोटो; आहे प्रसिद्ध फोटोग्राफर

‘या’ अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा; शेअर केले बाथरुममधले फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.