बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी दुसऱ्या धर्मातील मुलींशी लग्न केले आहे

भारतात प्रेम विवाहाला घेऊन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पण तरीही आजही अनेक लोक प्रेम विवाह करतात. प्रेमात कधीच जात धर्म यांचा विचार केला जात नाही. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांनी देखील दुसऱ्या धर्मीय मुलीशी लग्न केले आहे.

१)सुनील दत्त – आत्ता लव्ह मॅरेज करणे थोडे सोपे आहे. पण काही वर्षांपूर्वी ही गोष्ट अशक्य होती. अशा परिस्थितीमध्ये देखील बॉलीवूड अभिनेते सुनील दत्त यांनी प्रेमविवाह केला. एवढेच नाही तर त्यांनी एका मुस्लिम मुलीशी लग्न केले.

त्यामुळे त्या काळी या गोष्टीची खुप मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. सुनील दत्तने अभिनेत्री नर्गिससोबत प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या वेळी त्यांना अनेकांनी धमक्या दिल्या होत्या. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि नर्गिससोबत लग्न केले.

२)संजय दत्त – वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संजय दत्तने देखील प्रेमविवाह केला. विशेष म्हणजे संजय दत्तने देखील एका मुस्लिम कुटुंबातील मुलीशी प्रेमविवाह केला. म्हणून हे लग्न देखील त्यावेळी खुप जास्त चर्चेत होते.

संजय दत्तने मान्यताशी लग्न केले. मान्यताचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. या लग्नाच्या अगोदर संजय दत्तने दोन लग्न केली होती. संजय आणि मान्यताला दोन मुले आहेत. आज हे दोघेही त्यांच्या संसारात सुखी आहेत.

३)सुनील शेट्टी – बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने देखील त्याची जीवनसाथी म्हणून एका मुस्लिम मुलीची निवड केली होती. त्यांच्या बायकोचे नाव माना कादरी असे आहे. दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले होते. माना आज सुनील शेट्टीसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळत आहे.

४)ह्रितिक रोशन – बॉलीवूडचा सुपरहिरो ह्रितिक रोशनने देखील एका मुस्लिम मुलीसोबत लग्न केले. ह्रितिकने अभिनेता संजय खानची मुलगी सुझैनसोबत २००० मध्ये लग्न केले. त्यांना लग्नानंतर दोन मुलं झाली. पण काही वर्षांनी हे दोघे वेगळे झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

३० वर्ष बॉलीवूडमध्ये असूनही गोविंदासोबत ‘असे’ वागतात बॉलीवूडचे कलाकार

अरबाझसोबत घटस्फोट का घेतला? मलायकाने सांगीतली अनेक धक्कादायक कारणे

…म्हणून अलका कुबलने आपल्या दोन्ही मुलींना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवलेय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.