विवाहित असताना देखील अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाले होते ‘हे’ अभिनेते

फिल्म इंडस्ट्रीमध्ये विवाहबाह्य संबंध असणे यात काही नवीन नाही. अनेक कलाकारांचे असे आहेत जे विवाहीत असूनही त्यांच्या को स्टारच्या प्रेमात पडले होते. एक दोन नाही तर असे अनेक अभिनेता आहेत जे त्यांच्या कोस्टारवर फिदा झाले.

अक्षय कुमार, अजय देवगन, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा अनेक मोठ्या मोठ्या अभिनेत्यांच्या नावाचा समावेश या यादीत होतो. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत. जे अभिनेत्रींच्या प्रेमात तर पडले होते. पण आपल्या प्रेमासाठी त्यांनी कधीच पत्नीला किंवा कुटूंबाला सोडले नाही.

१ धर्मेंद्र – या यादीत सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे धर्मेंद्रचे. धर्मेंद्रने १९ व्या वर्षी घरच्यांच्या पसंतीने प्रकाश कौरसोबत लग्न केले होते. लग्नानंतर धर्मेंद्र चार मुलांचे वडील झाले होते. चार मुलांचे वडील धर्मेंद्र अभिनेत्री हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते.

चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेले गे प्रेम लग्नापर्यंत जाऊन पोहोचले होते. पण हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला सोडले नाही. धर्म बदलून त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले आणि दुसरा संसार सुरू केला.

२ सनी देओल – सनी देओलने बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पुजा देओलसोबत लग्न केले होते. पण तरीही सनी अभिनेत्री अमृता सिंग आणि डिंपल कपाडियाच्या प्रेमात पडला. अनेक दिवस त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. पण तरीही त्याने बायकोला सोडले नाही. तो आजही बायकोसोबत आहे.

३ महेश भट्ट – आलिया भट्टचे आई वडील महेश भट्ट आणि सोनी राजदानची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यावेळी महेश भट्ट अगोदरच विवाहित होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव लॉरेन होते. महेश भट्टने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले.

४ सलीम खान – सलीम खानचे कुटुंब बॉलीवूडमधील सर्वात मोठे कुटुंब आहे. सलीम खानने देखील दोन लग्न केले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सलमा खान आहे. समील खान हेलनच्या प्रेमात पडले होते. पण त्यांनी प्रेमासाठी पत्नी आणि कुटुंबाला सोडले नाही. त्यांनी तसेच दुसरे लग्न केले.

५ राज बब्बर – राज बब्बर आणि स्मिता पाटीलची जोडी बॉलीवूडमधल्या सर्वात हिट जोड्यांपैकी एक होती. दोघांच्या लव्ह स्टोरीची खुप जास्त चर्चा झाली होती. राज बब्बर अगोदरच विवाहित होते. त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच स्मिता पाटीलसोबत लग्न केले होते.

महत्वाच्या बातम्या –
विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम
घटस्फोटानंतरही अभिनेत्री पुजा बेदी आहे तब्बल ‘एवढ्या’ करोडची मालकिण; जाणून घ्या..
लाडकी लेक जीजासोबत अभिनेत्री उर्मिला कोठारेचे भन्नाट नृत्य, लेकीनेही धरलाय ठेका
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.