३० वर्ष बॉलीवूडमध्ये असूनही गोविंदासोबत ‘असे’ वागतात बॉलीवूडचे कलाकार

गोविंदा बॉलीवूडचे सुपरस्टार आहेत. आजही लोक त्यांचा अभिनय डान्सचे वेडे आहेत. अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये मेहनत केल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे. एवढे यशस्वी अभिनेते असूनही बॉलीवूडमध्ये अनेकदा त्यांच्यासोबत वाईट वर्तन केले जाते.

गोविंदा आणि करण जोहरचे अनेक वेळा वाद झाले आहेत. करण जोहर बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यासोबतच करण जोहरने त्याच्या चित्रपटांमधून अनेक नवीन चेहऱ्यांना बॉलीवूडमध्ये लाँच केले आहे.

त्यामुळे करण जोहर त्याच्या चित्रपटांमूळे तर चर्चेत असतोच. त्यासोबतच तो त्याच्या कॉफी विथ करण या शोमुळे देखील खुप जास्त चर्चेत असतो. शोसोबतच करण जोहरची पार्टी ही बॉलीवूडमधली सर्वात मोठी पार्टी असते. या पार्टीमध्ये सर्व कलाकार येतात.

करण जोहरचा शो बॉलीवूडमध्ये खुप जास्त चर्चेत असतो. या शोमध्ये आत्तापर्यंत बॉलीवूडचे अनेक कलाकार आले आहेत. बॉलीवूडमध्ये नवीन येणारे सर्व कलाकार या करण जोहरच्या कार्यक्रमांमध्ये दिसतात. पण खुप मोजक्या लोकांना या शोमध्ये बोलवले जाते.

बॉलीवूडमध्ये एक अभिनेता असा आहे जो आत्तापर्यंत करण जोहरच्या कार्यक्रमांमध्ये दिसला नाही. या अभिनेत्याचे नाव आहे गोविंदा. गोविंदा ९० च्या दशकातील सर्वात प्रसिध्द अभिनेता आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमिरचे राज्य होते. असे असताना देखील गोविंदाने या सर्व अभिनेत्यांना मागे टाकुन स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तो बॉलीवूडचा सर्वात यशस्वी अभिनेता झाला.

९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेते असणारे गोविंदा आजपर्यंत कधीच करण जोहरच्या शोमध्ये दिसले नाहीत. एवढी वर्षे बॉलीवूडमध्ये असूनही गोविंदा बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये गेले नाहीत. कारण त्यांना निमंत्रणच देण्यात येत नाही.

गोविंदाने स्वतः एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, ‘मी ३० वर्षे बॉलीवूडमध्ये काम करत आहे. पण कधीच मी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी गेलो नाही. त्यांनी मला कधीच बोलवले नाही. कारण मी त्यांच्यासारखी गॉसिप करू शकत नाही’.

गोविंदा पुढे म्हणाले की,’करण जोहरने आजपर्यंत कधीच मला त्याच्या शोमध्ये बोलवले नाही. कारण मी स्टार किड नाही. मी बॉलीवूडमध्ये गावाकडून बाहेरून आलो आहे. मला इंग्लिश येत नाही. त्यासोबतच मला दुसऱ्या कलाकारांसारखी सगळ्या गोष्टींची चर्चा करता येत नाही. गॉसिप करता येत नाही. म्हणून मला त्या शोमध्ये बोलवले जात नाही’.

‘बॉलीवूड खुप प्रसिद्ध आहे. अनेक देशांमध्ये बॉलीवूडचे चित्रपट पाहिले जातात. पण लोकांना बॉलीवूडची दुसरी बाजू माहित नाही. इथे खुप मोठ्या प्रमाणावर गटबाजी केली जाते. बाहेरून आलेल्या कलाकारांकडे दुर्लक्ष केले जाते. मी ३० वर्षे इथे काम करत आहे. तरीही माझ्यासोबत असे वागतात. मग नवीन येणाऱ्या कलाकारांसोबत कसे वागत असतील’. असे देखील गोविंदा म्हणाले.

गोविंदाच्या या गोष्टीबद्दल करण जोहरला विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, मला याबद्दल माहीती नव्हते. गोविंदाला माझ्या वागण्याचे वाईट वाटले असेल तर मी सर्व मीडियासमोर त्यांची माफी मागतो. यापुढे मी त्यांना माझ्या कार्यक्रमांमध्ये नक्की बोलवेल’.

यावर गोविंदाने उत्तर दिले होते की, ‘करण जोहर बॉलीवूडला खुप मोठा दिग्दर्शक आहे. पण तो जसा दिसतो. तसा नाही. त्याचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. म्हणून मी त्यांच्यापासून लांब असतो’.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून अलका कुबलने आपल्या दोन्ही मुलींना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवलेय

संपादकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे शाहरुखला खावी लागली होती जेलची हवा

त्या गोष्टीचा सूड राजेश खन्नांनी उगवला; करोडोंच्या संपत्तीतील फुटकी कवडीसुद्धा डिंपलला दिली नाही

अरबाझसोबत घटस्फोट का घेतला? मलायकाने सांगीतली अनेक धक्कादायक कारणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.