जाणून घ्या आज काय करतात अभिनेते विनोद मेहराची मुलं?

विनोद मेहरा हिंदी चित्रपटसृष्ट्रीतील एक असे नाव ज्यांनी ६० आणि ७० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये राज्य केले होते. त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. पण त्यांचे फिल्मी करिअर सोपे नव्हते. त्यांच्या करिअरमध्ये अनेक उतार चढाव आले होते.

फिल्मी करिअरपेक्षा ते त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे जास्त चर्चेत असायचे. विनोद मेहराने तीन लग्न केले होते. मोना ब्रोका आणि बिंदीया गोस्वामीसोबत लग्न तुटल्यानंतर त्यांनी तिसरे लग्न किरणसोबत केले होते. किरण त्यांच्या कुटूंबासोबत केनियामध्ये राहत होत्या.

लग्नानंतर विनोद मेहराला रोहन आणि सोनिया ही दोन मुलं झाली. पण विनोद मेहराच्या आयूष्यात कुटूंबाचे सुख नव्हते. पत्नी आणि दोन मुलांना सोडून १९९० मध्ये विनोद मेहरा हे जग सोडून गेले. हार्ट अटैकमूळे विनोद मेहराचे निधन झाले होते.

विनोद मेहरांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांची मुलगी सोनिया फक्त दोन वर्षांची होती. पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मुलांसोबत केनियाला शिफ्ट झाल्या. विनोद मेहराची मुलं अभिनयापासून लांब राहू शकले नाहीत. त्यांना वडीलांप्रमाणे बॉलीवूडमध्ये काम करायचे होते.

रोहन आणि सोनिया दोघांनीही बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनोद मेहराची मुलगी सोनिया दिसायला खुपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. तिने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला यश मिळाले नाही.

आठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर सोनिया भारतात आली. तिने अनूपम खेरच्या स्कूलमधून अभिनयाचे शिक्षण घेतले. २००७ मध्ये तिने विकटोरिया २०३ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यासोबतच सोनियाचे करिअर देखील फ्लॉप झाले.

सोनियाने तिच्या करिअरमध्ये शॅडो, एक मैं और एक तुम, रागिनी एम एम एस अशा चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री म्हणून फ्लॉप झाल्यानंतर तिने काही दिवस एम टिव्हीच्या कार्यक्रमांमध्ये वीजे म्हणून काम केले. पण तिला यश मिळाले नाही.

त्यानंतर तिने बॉलीवूडला सोडण्याचा निर्णय घेतला. ती दुबईला शिफ्ट झाली. सध्या सोनिया दुबईमध्ये योगा टिचर म्हणून काम करते. ती सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते. तिच्या फोटोंना चाहते खुप पसंत करतात.

मुलीप्रमाणेच विनोद मेहराचा मुलगा रोहन देखील बॉलीवूड अभिनेता आहे. त्याने सैफ अली खानच्या बाजार चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. हा चित्रपट यशस्वी झाला नाही. पण रोहनचा लुक मात्र लोकांना खुप आवडला. तो लवकरच नवीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार

काय सांगता! एकाच वेळी दोघींना डेट करत होते बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा; बघा कोण होत्या ‘त्या’ दोघी

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

हातगाडीवर काम करून पोट भरत होती ‘ही’ अभिनेत्री; आज करते मराठी टेलिव्हिजनवर राज्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.