अभिनेता विजय संचारी यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला हा अभिमानास्पद निर्णय

राष्ट्रीय पुरस्कार विजयी कन्नड अभिनेते संचारी विजय यांचे आज, सोमवारी निधन झाले आहे. ३७ वर्षी विजय यांचा शनिवारी रात्री बंगळुरू जवळ अपघात झाला होता. या अपघातामध्ये विजय यांना गंभीर दुखापत झाली होती. ज्यानंतर उपचारादरम्यान संचारी विजय यांचा मृत्यू झाला.

सांचारी विजयवर उपचार घेत असलेल्या डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले होते. विजयचा भाऊ सिद्धेशने सांगितलं की, ‘विजयचा मेंदू काम करणे बंद झाला होता. म्हणून आम्ही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. सांचारी विजय याचा नेहमीच समाज सेवा करण्यावर कल होता आणि म्हणूनच आम्ही त्याचे अवयवदान करत आहोत.

या अपघातात त्यांच्या मेंदूला जबरदस्त जखम झाली. त्यांना त्वरीत एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान ते कोमात केले अन् अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विजय यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शनिवारी रात्री ११.४५ च्या सुमारास नविन आणि विजय हे औषधं खरेदीसाठी घरातून निघाले होते. नविनच्या घरी रात्री जेवल्यानंतर हे दोघं बाहेर पडले आणि त्याच्या घराजवळच काही अंतरावर हा अपघात झाला. विजय हा बान्नेरघट्टा रोडवरील वजारहल्ली इथे राहतो.

पावसामुळे बाईकचा तोल ढासळला आणि हा अपघात झाल्याचे नविनने पोलिसांना सांगितले. या दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजय कर्नाटकातील थिएटर सर्कलमधील एक सुप्रसिद्ध अभिनेता होता. तो त्याच्या नानू अवनाल्ला … अवलू, किलिंग वीरप्पन आणि नाथीचरामी अशा चित्रपटांसाठी ओळखला जातो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.