वा रं मर्दा! अभिनेता रुग्णवाहिका चालवून रुग्णांची करतोय सेवा; दिवसरात्र करतोय रुग्णांची मदत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.  कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी नातेवाईक धडपड करताना दिसून येत आहेत.

कोरोनाची लाट आल्यापासून आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, नर्स, आरोग्य अधिकारी रात्रं दिवस काम करत असल्याचं दिसून येत आहे. तसेच अभिनेते, उद्योजक, नेते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते कोरोना काळात गोरगरीबांच्या मदतीला धावले आहेत.

असाच एक अभिनेता आहे जो दिवसरात्र रुग्णवाहिका चालवून रुग्णांची सेवा करत आहे.  अर्जून गौडा असं त्या अभिनेत्याचं नाव आहे. अर्जूनने अनेक कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.

रुग्णांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचं, रुग्णाच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत रुग्णांना घेऊन जाण्याचं काम अर्जून गौडा करत आहे. प्रोजेक्ट स्माईल ट्रस्ट अंतर्गत त्याने रुग्णांच्या सेवेचं काम हाती घेतलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अर्जून हे काम करत आहे.

अर्जून गौडा रुग्णांना मदत करण्या बरोबरच स्वत:ची काळजी घेत आहे. पीपीई किट घालून तो न थकता रुग्णांच्या मदतीला धावून जात आहे. गेल्या कित्येक दिवसात त्याने अनेक कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

अर्जूनने रुग्णांसाठी स्वत: एक रुग्णवाहिका घेतली आहे. ती रुग्णवाहिका स्वत:च चालवून  लोकांचा धर्म, जात न बघता अर्जून मोठ्या मनाने रुग्णांना मदत करत आहे. आणखी काही महिने तो रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालवून त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन; कोरोनाच्या उपचारादरम्यान आला हृदविकाराचा झटका
धक्कादायक! मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन
मोदींमुळे भारतावर भूतानकडून मदत घेण्याची वेळ आलीय, कुठे नेऊन ठेवला रे देश माझा?
प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.