करिअर वाचवण्यासाठी स्वत: च्याच चित्रपटाचे तिकीट खरेदी करत होता ‘हा’ अभिनेता

फिल्म इंडस्ट्रीतील जम्पिंग जॅक म्हणून ओखळ असणारे जितेंद्र आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणारे जितेंद्र आज इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक आहेत. बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव येते.

ज्यूनिअर आर्टिस्ट ते सुपरस्टार हा प्रवास जितेंद्रसाठी सोपा नव्हता. या प्रवास पुर्ण करण्यासाठी त्यांना खुप मेहनत घ्यावी लागली होती. एक एक चित्रपट मिळवण्यासाठी त्यांना दिवस रात्र मेहनत करावी लागली होती. एवढेच नाही तर त्यांना स्वत: पैसे खर्च स्वत:च्या चित्रपटाचे तिकीट खरेदी करावी लागली होती. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

जितेंद्र ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन आले होते त्यावेळी त्यांना काम मिळवण्यासाठी खुप मेहनत करावी लागली होती. जितेंद्र स्ट्रगल करत होते त्यावेळी रविकांत नागाईज दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी करत होते. ते इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॅमेरा मॅन होते. पण दिग्दर्शनाचे क्षेत्र त्यांच्यासाठी नवीन होते.

रविकांतने फर्ज चित्रपटाची स्क्रिप्ट देखील तयार केली होती. त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांना या चित्रपटाची ऑफर दिली. रविकांतचा हा पहीलाच चित्रपट असल्यामूळे सगळ्यांनी चित्रपटाला नकार दिला. शेवटी फिरुन फिरुन हा चित्रपट जितेंद्रकडे गेला.

जितेंद्र त्यावेळी नवीन होते. त्यांनी जास्त विचार न करता चित्रपट साईन केला. जितेंद्रने होकार देताच चित्रपटाची तयारी सुरु झाली. शुटींग सुरु झाली त्यावेळी जितेंद्र आणि रविकांतची एकच इच्छा होती की, हा चित्रपट हिट व्हावा. कारण दोघांसाठी हा चित्रपट खुप महत्वाचा होता.

पण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. सर्वांना चित्रपटाला फ्लॉप ठरवले. जितेंद्रसाठी ही खुप मोठी गोष्ट होती. कारण हा चित्रपट फ्लॉप झाला तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये परत काम मिळणार नाही. या भीतीने त्यांची अवस्था खराब झाली.

शेवटी जितेंद्रने या सगळ्यांवर एक उपाय शोधला. स्वत: चित्रपटाचे तिकीट खरेदी करण्याचा विचार त्यांनी केला. सुरुवातीला त्यांना ही गोष्ट चुकीची वाटत होती. पण नंतर मात्र करिअरसाठी त्यांना हे काम करावे लागले. त्यावेळी जितेंद्रने पाच हजार खर्च करुन चित्रपटाची सगळी तिकीट खरेदी केला आणि लोकांमध्ये फ्रिमध्ये वाटली.

सुरुवातील चित्रपट फ्लॉप ठरला. पण जितेंद्रने घातलेले पाच हजार त्यांच्या कामाला आले. दोन आठवड्यांमध्ये चित्रपट हिट ठरला. लोकांना चित्रपट आवडला नसला तरी हा चित्रपट हिट झाला होता. त्यामूळे सगळ्या इंडस्ट्रीला धक्का बसला होता. जितेंद्रने करिअर वाचवण्यासाठी घेतलेली मेहनत त्यांच्या कामी आली. त्यांना इंडस्ट्रीमध्ये चांगले काम मिळाले आणि ते स्टार बनले.

महत्वाच्या बातम्या –
टेलिव्हिजनवरील कलाकारांचे घर फक्त अभिनयाने चालत नाही; म्हणून करतात ‘हे’ काम
बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांनी कधीच केला नाही सावत्र आईचा स्वीकार; एक तर आईला म्हणाली चुडैल
सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारी भाऊ कदम यांची लाडकी लेक करणार मनोरंजन सृष्टीत प्रवेश?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.