संदीप पाठक सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात सक्रिय बघायला मिळतो. इतकेच नव्हे तर तो सोशल मीडियावर सूरु असणारे ट्रेंड्स देखील फॉलो करतांना दिसतो. प्रेक्षकांना त्याच्या विनोदी अभिनयाने हसवून सोडणारा संदीप पाठक चाहत्यांचा लाडाचा अभिनेता आहे. तसेच एखाद्या मुद्द्यावर आपले मत निर्धास्त पणे तो मांडत असतो.
नुकताच संदीप पाठकचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. प्रवास करत असतांना रस्त्यात भेटलेल्या आजीच्या मदतीला तो धावून गेला. तसेच त्या आजींसोबत त्याने वेळ घालवला आहे. त्याच्या या कृत्यामुळे संदीपचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संदीपने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.
शूटिंगला निघाला असतांना त्याला रस्त्यात एक आजीबाई भेटल्या. त्या आजींची बस चुकल्यामुळे त्यांना ज्या गावाला जायचे होते त्यासाठी त्या आजी रस्त्यावर गाडीची वाट बघत होत्या. संदीपने आजींना स्वतःच्या गाडीत लिफ्ट देत, त्यांना त्यांच्या गावी सोडले. दरम्यान, या प्रवासात त्याने आजींसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या आयुष्यबाबद्दल जाणून घेतले तसेच त्यांची चौकशी केली. सुख- दुःख जाणून घेतले.
संदीपच्या अशा वागण्याने आजी भारावून गेल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आजींची प्रेमाने चौकशी करणाऱ्या संदीपचे सर्वत्र कौतुक होत आहे. नंतर आजींनी त्याला आशीर्वाद देखील दिले आहे. संदीपचा हा मनाचा मोठेपणा त्याचा सर्व चाहत्यांना भावला आहे. तसेच सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.
https://twitter.com/mesandeeppathak/status/1619912424769069058?s=20&t=z4GXe4S4ZePe3I9iy6hq_Q
त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. लोकांनी या व्हिडीओला प्रतिसादाचा वर्षाव केला आहे. ‘कौतुकास्पद, खरा हिरो, गावाकडचा माणूस’ अशा वेगवेगळ्या सिमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ संदीपने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला असून अनेक लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.
मराठी चित्रपटात अभिनयाची छाप उमटवत चाहत्यांचा वेगळा वर्ग संदीपने निर्माण केला आहे. स्वतःच्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मराठी चित्रपट सृष्टीत आपले नाव कमावले आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांत तो अभिनय करतांना दिसतो.
महत्वाच्या बातम्या
‘बागेश्वरला दिसेल तिथे ठोका’; तुकाराम महाराजांच्या अपमानानंतर भडकलेल्या ‘या’ बड्या नेत्याचे आदेश
सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; त्याला गुपचूप मेसेज केला अन्…
गौतमी पाटीलच्या पहील्या चित्रपटात तिच्यासोबत झळकणार ‘हा’ दिग्गज अभिनेता; पहा कुणाला लागली लाॅटरी