बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सख्या भावासोबत केला होता फिल्मी पडद्यावर रोमान्स; लोकांनी दिल्या शिव्या

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक कॉमेडियन असे देखील होते ज्यांना चित्रपटांमध्ये अभिनेत्यांपेक्षा जास्त पैसे दिले जायचे. त्या कॉमेडियनचे नाव होते मेहमूद. मेहमूद यांचे पुर्ण कुटूंबच फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. म्हणून त्यांना किंवा त्यांच्या कुटूंबाला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

आजही बॉलीवूडमध्ये मेहमूद यांची जागा कोणताही कॉमेडियन किंवा अभिनेता घेऊ शकला नाही. कारण त्यांच्यासारखी कॉमेडी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला जमू शकली नाही. त्यांचा कॉमेडी टाईमिंग अप्रतिम होता. त्यांचा प्रत्येक विनोद आणि त्यांचे हावभाव लोकांना पोट पकडून पकडून हसायला लावायचे.

अभिनयात आपल्या नावाचा शिक्का चालवणारे मेहमूद एकाकाळी अडचणीमध्ये अडकले होते. कारण त्यांनी एका चित्रपटात स्वत च्याच बहीणीसोबत रोमान्स केला होता. म्हणून लोकं त्यांना खुप काही बोलले देखील होते. त्यांचे नाव सगळ्या इंडस्ट्रीमध्ये खराब झाले होते.

खुप कमी लोकांना माहीती असेल की, मेहमूद यांना एक छोटी बहीण देखील होती. त्यांचे नाव होते मीनू मुमताज. त्यांचा जन्म २६ एप्रिल १९४२ मध्ये झाला होता. सगळे कुटूंब फिल्मी क्षेत्रात कार्यरत असल्यामूळे त्यांना देखील अभिनयात रुची होती. म्हणून त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.

अभिनयासोबतच त्या उत्तम डान्सर देखील होत्या. त्यांनी डान्सचे शिक्षण घेतले होते. त्यांना देविका राणीने बॉलीवूडमध्ये पहीला ब्रेक दिला होता. बॉम्बे टॉकीजमध्ये त्यांनी मुमताजला डान्सर म्हणून ठेवले होते. १९५५ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘घर घर मैं दिवाली’मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

पण मीनू मुमताजला खरी ओळख ‘सखी हातिम’ चित्रपटातून मिळाली होती. त्या यशस्वी अभिनेत्री प्रसिद्ध होत होत्या. त्याकाळात त्यांच्या करिअरमध्ये एक तुफान आले. त्यांनी केलेली एक चुक त्यांचे सगळे करिअर खराब करुन गेली.

१९५८ मध्ये आलेल्या ‘हावडा ब्रीज’ चित्रपटामध्ये मीनूने त्यांचे भाऊ मेहमूदसोबत रोमान्स केला होता. भाऊ बहीणीचा ऑनस्क्रिन रोमान्स बघून प्रेक्षक चिडले. त्यांनी मीनू आणि मुमताजला नावे ठेवायला सुरुवात केली. चित्रपटात मीनू आणि मुमताजसोबतच कॉमेडियन जॉनी वॉकरसोबत देखील मीनूची जोडी चांगली जमली होती.

या चित्रपटानंतर मीनूने अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी रोल केले. त्यासोबतच अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साईड रोल देखील केले. पण त्यांचे करिअर लवकरच खराब झाले. १९६३ मध्ये दिग्दर्शक सैयद अली अकबरसोबत लग्न करुन मीनूने फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला.

लाईमलाईटपासून दुर आयूष्य जगणाऱ्या मीनूच्या आयूष्यात सर्वात मोठे संकट लग्नानंतर आले. एक दिवस अचानक त्यांच्या डोळ्यांना दिसणं बंद झाले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर समजले की, त्यांना १५ वर्षांपासून ट्यूमर आहे. ऑपरेशन करुन त्यांचा ट्यूमर काढून टाकण्यात आला. सध्या त्या कुटूंबासोबत कॅनडामध्ये आयूष्य जगत आहेत.

महत्वाच्या बातम्या –
‘तारक मेहता..’ मालिकेत दयाबेन कधी येणार? निर्माते असीम मोदींनी स्पष्टच सांगीतलं..
बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकांनी केले आहेत दोन लग्न; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत?
बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकांनी केले आहेत दोन लग्न; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत?
बॉलीवूडच्या अभिनेत्रीच नाही तर ‘या’ अभिनेत्यांनी देखील केला आहे रंगभेदाचा सामना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.