‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर आतापर्यंत १६.७१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. नुकतेच चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श(Taran Adarsh) यांनी ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या कमाईचे आकडे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहेत.(actor ritesh deshmukh tweet about pavankhind fiilm)
‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटाची भुरळ आता अभिनेता रितेश देशमुखला(Ritesh Deshmukh) देखील पडली आहे. अभिनेता रितेश देशमुखने ‘पावनखिंड’ या चित्रपटासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत असताना मराठी प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत.
अभिनेता रितेश देशमुखने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “हे अविश्वसनीय आहे. पावनखिंडच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. थियटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार.” या ट्विटसोबत अभिनेता(Actor) रितेश देशमुखने चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने शेअर केलेला ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या कमाईचा आकडा देखील पोस्ट केला आहे.
https://twitter.com/Riteishd/status/1498231518522912771?s=20&t=5sv_mK0WykcfX8FlRztb_w
अभिनेता रितेश देशमुखच्या या ट्विटवर लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी ‘पावनखिंड’ हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणावा, अशी मागणी केली आहे. ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १. १५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने १.५५ कोटींची कमाई केली.
रविवारी या चित्रपटाने १.९७ कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत १६.७१ कोटींचा गल्ला जमवला आहे. पावनखिंड’ सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे.
या चित्रपटात बाजीप्रभूंची भूमिका अजय पुरकर यांनी केली आहे. बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांचे प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. पावनखिंड या चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बोल्ड सीन्समध्ये मर्यादा ओलांडणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले तुफान मादक फोटो, चाहते झाले पागल
म्हणून बारावीत ९७ टक्के असूनही देशात कुठेच ॲडमिशन मिळाले नाही; नवीनच्या वडीलांनी सांगीतले खरे कारण
‘पुतिन यांच्या सुचना न पाळणाऱ्या सैनिकांसोबत करणार सेक्स’, युद्ध रोखण्यासाठी मॉडेलची विचित्र ऑफर