स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३९ वी जयंती आहे. यानिमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा(Randeep Hudda) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारणार आहे.(actor randeep huda veer savrkar film first look reveled)
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फर्स्ट लूकमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसत आहे.
या लूकमध्ये अभिनेता रणदीप हुड्डाला ओळखणे कठीण आहे. फर्स्ट लूकसोबत चित्रपटाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे. ‘हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है” असे या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटासंदर्भात माहिती दिली आहे.
The revolutionary freedom fighter, presenting @RandeepHooda in & as #SwatantraVeerSavarkar Motion Poster! #139yearsofsavarkar@anandpandit63 @thisissandeeps @directorsamkhan@apmpictures @LegendStudios_ #roopapandit #zafarmehdi @deepaksahupr pic.twitter.com/nZBE471jIx
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) May 28, 2022
या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार येथे होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेसाठी अभिनेता रणदीप हुड्डा खूप मेहनत घेत असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेसाठी अभिनेता रणदीप हुड्डाने वजन कमी केले आहे.
The revolutionary freedom fighter, presenting @RandeepHooda in & as #SwatantraVeerSavarkar! #139yearsofsavarkar@anandpandit63 @thisissandeeps @directorsamkhan@apmpictures @LegendStudios_ #roopapandit #zafarmehdi @deepaksahupr pic.twitter.com/taW5cKv6nM
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) May 28, 2022
एका मुलाखतीमध्ये अभिनेता रणदीप हुड्डाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटसंदर्भात माहिती दिली आहे. “आपल्या देशात अनेक क्रांतिकारी होते, ज्यांनी स्वांतत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावली होती. विनायक दामोदर सावरकर हे त्यातील एक महत्वाचे क्रांतिकारी होते. आगामी चित्रपटात मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारताना मला आनंद होतं आहे”, असे अभिनेता रणदीप हुड्डाने मुलाखतीत सांगितले होते.
या चित्रपटाच्या संदर्भात माहिती देताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, “लोंकाच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण एक दिग्दर्शक म्हणून मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे”, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही आम्हाला पाठबळ मिळत नाही; शिवसेना खासदाराने व्यक्त केली खंत
ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?
करणी सेनेच्या तक्रारीनंतर अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चे बदलले नाव, आता ‘या’ नावाने होणार रिलीज