पार्टीत सगळ्यांसमोर राजकूमारने केला होता सनी देओलचा अपमान; चिडलेल्या सनी देओलने…

बॉलीवूडमध्ये आपल्या स्वभावामूळे प्रसिद्ध असलेले अभिनेते राजकूमार यांचे सगळीकडे करोडो चाहते आहेत. राजकूमार यांचा एक वेगळाच अंदाज होता. त्यामूळे त्यांच्याशी बोलताना लोकं हजार वेळी विचार करायचे. ते कधी कोणाला काय बोलतील आणि काय करतील हे सांगता येत नव्हते. म्हणून त्यांच्यापासून लांब राहणे लोकांना पसंत होते.

आज असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यावेळी राजकूमारने सुपरस्टार धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलचा सगळ्यांसमोर अपमान केला होता. या पार्टीमध्ये राजकूमार सनीला असे काही तरी बोलले ज्यामूळे सनी देओल खुप दुखी झाला आणि पार्टीमधून निघून गेला. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

बॉलीवूडमध्ये चित्रपट हिट झाल्यानंतर कलाकार पार्टी करत असतात. अशीच एक पार्टी अभिनेते धर्मेंद्र यांनी दिली होती. ही पार्टी त्यांचा चित्रपट ‘राजतिलक’ हिट झाल्यामूळे देण्यात आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. त्यामूळे त्यांनी हा आनंद साजरा करण्यासाठी पार्टी दिली होती.

हा चित्रपट बिग बजेट होता. धर्मेंद्रसोबत चित्रपटामध्ये हेमा मालिनी, कमल हसन, रिना रॉय मुख्य भुमिकेत होते. बिग बजेट चित्रपट हिट झाल्यामूळे धर्मेंद्रने मोठी पार्टी दिली होती. धर्मेंद्रच्या पार्टी इंडस्ट्रीतील मोठे मोठे कलाकार उपस्थित होते. राजकूमार देखील पार्टीला आले होते.

पार्टीमध्ये कलाकारांसोबत त्यांचे कुटूंब देखील उपस्थित होते. धर्मेंद्रचे पुर्ण कुटूंब पार्टीला उपस्थित होते. याच पार्टीमध्ये राजकूमारने सनी देओलला पाहीले आणि त्याची मस्करी करायला सुरुवात केली. कारण राजकूमारला माहीती नव्हते की, सनी देओल धर्मेंद्रचा मोठा मुलगा आहे.

सनीला पाहून राजकूमार म्हणाले की, हा गोरा गोरा मुलगा कोण आहे. एवढा गोरा मुलगा तर आल्लूसारखा दिसतोय. त्यानंतर सनी आणि राजकूमार यांची ओळख करुन देण्यात आली. धर्मेंद्रचा मुलगा आहे हे समजल्यानंतर तर राजकूमारने सनी अजून चिडवायला सुरुवात केली.

असा अपमान पाहून सनी देओलला राग आला. पण ते राजकूमारला काहीही बोलू शकला नाही. सनीचा राग मात्र त्याच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत होता. सनीचा रागीट चेहरा पाहून राजकूमार शांत झाले आणि थोड्या वेळाने तिथून निघून गेले. पण ही गोष्ट सनी देओल मात्र कधीही विसरु शकला नाही.

महत्वाच्या बातम्या –
विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम
सैराटफेम आर्चीच्या मनात आहे ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; म्हणतीय त्याच्यासोबत डेटवर जायचंय
माधुरी दीक्षितच्या आई वडिलांनी सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि…
हुबेहूब माधूरी दिक्षितच्या कॉपी आहेत बॉलीवूडच्या ‘य़ा’ अभिनेत्री; जाणून घ्या कोण कोण आहे या यादीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.