बॉलीवूडचे खतरनाक खलनायक प्राण शेवटच्या दिवसांमध्ये ‘असे’ आयुष्य जगत होते

फिल्म इंडस्ट्रीतील एक असे व्यक्तीमत्व ज्यांच्या नावाने लोकं घाबरायची. त्यांचे काम बघुन लोकांनी आपल्या मुलांचे प्राण नाव ठेवणे बंद केले होते. बॉलीवूडचे प्रभावशाली अभिनेते आणि खलनायक प्राण. ५० आणि ६० च्या दशकातील प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे.

त्यांचे खरे नाव प्राण किशन सिंकींद होते. त्यांचा जन्म दिल्लीतील कोठवडी भागात झाला होता. त्यांचे वडील इंजिनिअर होते. तर आई गृहिणी होत्या. प्राण यांना लहानपणापासून फोटोग्राफीची खुप जास्त आवड होती. त्यांना फोटोग्राफर होण्याची इच्छा होती.

पण प्राण बॉलीवूडमध्ये अभिनेते झाले. प्राण यांचा एक किस्सा खुप प्रसिद्ध आहे. प्राण एकदा पान खाण्यासाठी दुकानात गेले होते. तिथे त्यांना चित्रपटाच्या निर्मात्यांनी पाहिले आणि अभिनय क्षेत्रात येण्याची संधी दिली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. पण नंतर मात्र ते तयार झाले.

प्राण यांनी लाहोर फिल्म इंडस्ट्रीमध्ये खुप चांगली ओळख निर्माण केली होती. फाळणीनंतर ते मुंबईला आले. लाहोरच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांची एक वेगळी ओळख होती. पण मुंबईत त्यांना काम मिळत नव्हते. त्यांच्या कुटुंबाच्या गरजा देखील पुर्ण होत नव्हत्या.

अशा परिस्थितीत त्यांनी एका मित्राच्या मदतीने ‘झिद्दी’ चित्रपटामध्ये काम मिळवले. या चित्रपटात त्यांनी देवानंदसोबत काम केले. हळूहळू त्यांचे अभिनय कौशल्य बघून त्यांना बॉलीवूडमध्ये काम मिळत होते. पण त्यांना खलनायक म्हणून जास्त काम मिळत होते.

देवानंद, दिलीप कुमार अशा अभिनेत्यांच्या चित्रपटामध्ये प्राण खलनायक म्हणून काम करत होते. राज कपूरसोबत देखील प्राण यांनी चोरी चोरी, छलिया अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकानंतर एक नवीन अभिनेते येत होते. पण खलनायक मात्र एकमेव प्राण होते.

प्राण यांनी फक्त खलनायक म्हणून काम केले नाही. ‘हाफ तिकीट’ चित्रपटात त्यांनी विनोदी व्यक्तीरेखा देखील निभावली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या अभिनय कौशल्यामूळे प्रेक्षक त्यांना सगळ्या प्रकारच्या भुमिकांमध्ये स्वीकार करत. प्राण एकमेव असे खलनायक आहेत ज्यांना अभिनेत्या पेक्षा जास्त पैसे दिले जायचे.

५० आणि ६० च्या दशकात त्यांना खलनायक म्हणून ओळखले जात होते. पण १९६८ मध्ये रिलीज झालेल्या मनोज कुमारच्या ‘उपकार’ चित्रपटामूळे त्यांना एक वेगळी ओळख देखील मिळाली. या चित्रपटामूळे त्यांना अजून वेगवेगळ्या भुमिका मिळत होत्या.

फक्त ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटच नाही तर कलरफुल चित्रपटांमध्ये देखील त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. अमिताभ बच्चनच्या ‘झंजिर’ चित्रपटामध्ये अमिताभ पेक्षा मोठी भुमिका प्राण यांनी निभावली. एवढेच नाही तर त्यांनी या चित्रपटात गाणे देखील गायले.

त्यांनी कमस, शेरनी, मोहोबत के दुष्मन, इमानदार, जादूगार,तुफान, शराबी, सौतन, हम है बेमिसाल, गुडीया, बदमाश यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका निभावल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भुमिकेला प्रेक्षकांनी खुप प्रेम दिले.

प्राण त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. त्यासोबतच ते अनेक कार्यक्रमांमध्ये देखील यायचे. त्यांनी शेवटी अनेक मुलाखती देखील दिल्या आहेत. २०१३ मध्ये बॉलीवूडच्या या महान अभिनेत्याचे निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये दया भाभीच्या कमबॅकवर परत एकदा प्रश्नचिन्ह कारण…

बॉलीवूडच्या ‘या’ ब्युटीसोबत युवराज सिंगला करायचे होते लग्न पण….

अक्षय खन्नासोबत बॉलीवूडमध्ये लाँच झालेली ‘ही’ अभिनेत्री आज कुठे आहे

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीचा कोरोनामुळे झाला मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.