Jay Shah : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रविवारी दुबईमध्ये पार पडला. यात भारतीय संघाचा विजय झाला. भारतीय संघाला या विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. या सामन्यात भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली. त्याने या सामन्यात पाकिस्तानच्या ४ विकेट्स घेतल्या.
पण या सामन्याचे मुख्य आकर्षण हार्दिक पांड्या ठरला. त्याने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या वेळी अनेक सेलिब्रिटी सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते. यावेळी स्टेडिअममधील एक घटना कॅमेरात कैद झाली व ती प्रचंड व्हायरल होत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे पुत्र व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते. सामना जिंकल्यानंतर त्यांच्या एका सहकार्याने जय शाह यांच्या हातात तिरंगा पकडण्यासाठी दिला. मात्र, त्यांनी तो पकडण्यास नकार दिला.
या घटनेचे दृश्य कॅमेरात कैद झाले व ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच जय शाहांच्या या कृतीवर त्यांच्यावर प्रचंड टीकाही होत आहेत. यातच अभिनेते प्रकाश राज यांनी एक ट्विट करत जय शाह यांच्यावर टीका केली आहे. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.
“प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री…. जय शाह यांना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी भारतीय तिरंगा हातात घेऊन फडकवण्याची गरज नाही. पण जर कोणी बिगर भाजप, हिंदू किंवा माझ्यासारख्या तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीने हे केले असते, तर यावर तुमची आणि तुमच्या भक्तांची प्रतिक्रिया काय असेल?,” असा सवाल प्रकाश राज यांनी ट्विटमधून केला आहे.
जय शहा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे सचिवच नाहीतर ते आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्षदेखील आहेत. तसेच ते ICC मध्येही सदस्य म्हणून काम पाहतात. त्यामुळे ICC च्या नियमानुसार ते कोणत्याही संघाला एकतर्फी पाठींबा देऊ शकत नाहीत. त्यांनी सर्व सदस्यांप्रती समान भावना ठेवायला हवी. त्यामुळे त्यांनी तिरंगा हातात घेतला असता तर ते नियमाच्या विरुद्ध असते, असेही बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! सर्वात जवळच्या विश्वासू सहकाऱ्यानेच केला शिंदे गटात प्रवेश
बंजारा समाजाच्या नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट; संजय राठोडांना पाडण्यासाठी बंजारा समाज एकवटला
‘या’ कारणावरून शिवसेनेत धूमशान, आणखी एक आमदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ?
हे अति झालं! भाजपच्या महिला नेत्याने गाठला क्रूरतेचा कळस; मोलकरणीला घरात डांबून दात तोडले, अन्…