सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यावर आता आलीय उपासमारीची वेळ, घर खर्चासाठीही नाहीत पैसे

मुंबई । सध्या देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे देशात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. सर्वांनाच मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यातच अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली तर काहींना काम नसल्यामुळे घरीच बसावे लागत आहे.

टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अनेकांना याचा फटका बसल्याचे समोर आले आहे. एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या चेतन हंसराज या नामांकित टीव्ही अभिनेत्यावर कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आली आहे. त्याने स्वतः ही माहिती दिली आहे.

सध्या कोरोनामुळे शूटिंग बंद असल्याने हंसराज हा देखील बेरोजगार झाला आहे. न्यूज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत हंसराजने आपल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत म्हटले की, इतर कलाकारांप्रमाणेच मी घरात बसलो आहे. यामुळे तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

तो म्हणाला, की, यापूर्वी केलेल्या कामाचा मोबदला देखील अद्याप मिळालेला नाही, त्यामुळेच माझ्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा बोजा वाढत आहे. चेतन हंसराजने काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात टीव्ही मालिकेत काम केले होते. त्यावेळी तो सर्वाधिक मानधन घेत होता. मात्र आता अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

आज त्याचा वाढदिवस असून मित्रांना पार्टी देण्यासाठी देखील चेतन हंसराज याच्याकडे पैसे शिल्लक नाहीत, असेही तो म्हणाला. लवकरच ही परिस्थिती जाऊन जुने दिवस परत येतील, अशी आशा चेतन हंसराजने व्यक्त केली आहे. यामुळे या काळात मोठ्या अभिनेत्यांवर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य लोकांवर तर काय वेळ येत असेल.

कोरोनामुळे सगळे जग काहीसे थांबले आहे. अर्थव्यवस्था देखील संकटात सापडली आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रातच याचा मोठा फटका जाणवत आहे. आता काही प्रमाणात परिस्थिती सुधारत आहे. मात्र याला अनेक वर्ष जाणार आहेत.

ताज्या बातम्या

…तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवले यांच्या वक्तव्याने खळबळ

या मराठमोळ्या मुलीच्या तलवारबाजीपुढे भले भले योद्धे घायाळ होतील; पहाच एकदा व्हिडिओ

पुण्यात साधी नोकरी करणारा युवक कसा झाला ‘देवमाणूस’; नकारात्मक पात्र असूनही करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.