अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; मालिकांमध्ये करते काम

मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेते आहेत. पण काही अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली. अभिनेत्यांनी कोणतीही भुमिका निभावली तरी प्रेक्षकांना आवडते. असेच एक अभिनेते म्हणजे निळू फुले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांच्या भुमिकांना अजरामर केल्या आहेत.

निळू फुलेने करिअरमध्ये अनेक नकारात्मक भुमिका निभावल्या आहेत. त्यामुळे त्यांना मराठीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जाते. खलनायक म्हणून निळू फुले यांना सर्वचजण ओळखतात. त्यासोबतच एक उत्तम माणूस म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

खुप कमी लोकांना माहीती असेल की निळू फुले यांच्या कन्या देखील अभिनय क्षेत्रात आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. जाणून घेऊया निळू फुले यांच्या मुलीबद्दल.

निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले थत्ते आहे. त्यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे अभिनय शिकण्यासाठी त्यांना जास्त काही करावे लागले नाही. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या वडिलांकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत.

गार्गी यांचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातून पुर्ण केले. तर पुढील शिक्षणासाठी त्या मुंबईत गेल्या. त्यांनी एमएचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.

अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर गार्गी यांनी झी युवावरील ‘कट्टी बट्टी’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर प्रवेश केला. त्यांना काम मिळाले होते. पण त्यांना अभिनेत्री म्हणून खरी ओळख झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून मिळाली.

सुरुवातीला जेव्हा गार्गीला तुला पाहते रे मालिकेसाठी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या मालिकेला नकार दिला होता. कारण त्यांची कट्टी बट्टी मालिका सुरू होती. त्यामुळे त्यांनी निर्मात्यांना नकार दिला होता.

पण निर्मात्यांनी परत एकदा विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘माझी कट्टी बट्टी मालिका सध्या सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतरच मी दुसरी मालिका सुरू करणार आहे’. त्यानंतर निर्मात्यांनी काही दिवस वाट बघितली. कट्टी बट्टी मालिका संपल्यानंतर तुला पाहते रे मालिका सुरु करण्यात आली होती.

या मालिकेत त्यांनी इशाच्या आईची भुमिका निभावली होती. ही मालिका टेलिव्हिजनवर खुप कमी वेळात प्रसिद्ध झाली. या मालिकेने गार्गीला खरी ओळख मिळवून दिली. त्यांना सगळीकडे इशाची आई म्हणून ओळख मिळाली.

सध्या त्या कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेत अभिनय करताना दिसत आहेत. या मालिकेत त्या विनोदी भुमिकेत दिसत आहेत. खऱ्या आयुष्यात गार्गीचा विवाह झाला आहे. त्यांनी २००७ मध्ये ओंकार थत्तेसोबत लग्न केले.

गार्गीला अनय हा मुलगा आहे. त्यांना अभिनयासोबतच वेशभूषा कला यामध्ये देखील रुची आहे. त्यांनी काही दिवस त्यात काम केले आहे. यासोबतच त्यांना कुकिंग आणि गाण्यात रुची आहे. पण सध्या त्या अभिनय क्षेत्रातील करिअरकडे लक्ष देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

का झाला होता शाहीद-करीनाचा ब्रेकअप? अखेर खरे कारण आले समोर

फोटोतला छोटा मुलगा मुंबईच्या चाळीत लहाणाचा मोठा झाला, आज करतोय बाॅलीवूडवर राज्य

टाइमपास म्हणून अभिनय करत होते आज बॉलीवूडचे सर्वात प्रभावशाली अभिनेते आहेत

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री अजय देवगनसोबत काम करायला घाबरतात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.