कुंडली जुळत नसल्याने मोहनलालच्या कुटुंबाने मोडलं लग्न, पण तरीही सुचित्राच बनली त्यांची सुन

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध जोडी मोहनलाल आणि सुचित्रा यांची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. मोहनलाल यांनी १९८८ मध्ये सुचित्राशी विवाह केला. सुरपरस्टार अभिनेत्याची पत्नी असताना सुचित्राने फिल्मी दुनियेपासून सतत स्वत:ला लांब ठेवले आहे.

मोहनलाल यांनी अभिनयासोबत निर्मिती, गायन आणि नाटकात काम केले आहे. एका इव्हेंटमध्ये सुचित्रा यांनी मोहनलाल यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतरची आठवण सांगितली आहे. त्या सांगतात पहिल्या नजरेत मोहनलाल त्यांना अजिबात आवडले नव्हते. त्या पुढे सांगतात, मी त्यांचा सर्वात जास्त द्वेष  तेव्हा करायचे जेव्हा ते चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारायचे.

सुचित्रा म्हणतात, खर तर मोहनलाल यांना माहिती होतं की ते खलनायकाची भुमिका करता म्हणून मी त्यांना पसंत करत नाही. परंतु त्यांचा ente mamattukkuttiyammakku हा चित्रपट मला खूप आवडला. तेव्हापासून मोहनलाल यांच्याविषयी माझ्या मनातील द्वेष संपला. मी त्यांच्या प्रेमात पडले आणि आम्ही दोघांनी लग्न केले.

आज मोहनलाल माझे सर्वात आवडते अभिनेते आहेत असं सुचित्रा म्हणतात. मोहनलाल आणि सुचित्रा यांची भेट होण्यापुर्वी ते सुपरस्टार बनले होते. आता सुचित्रा त्यांची खुप मोठी फॅन होती. दोघं एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र कुंडली न जुळल्यामुळे त्यांच्या लग्नाला कुटुंबातून विरोध केला गेला.

यानंतर कुंडली न जुळल्यामुळे मोडलेल्या त्यांच्या लग्नाला दोन वर्षे उलटली होती. तेव्हा एका शुटींगच्या वेळी मोहनलाल यांच्या कोणत्यातरी मित्राने त्यांना सांगितेले की, सुचित्रा त्यांची आजही वाट पाहत आहे. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुचित्रा आणि मोहनलाल यांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला आता ३३ वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलं आहेत.

महत्वाच्या बातम्या-
जिद्दीला सलाम! नेत्रहीन असणारी ही तरुणी बनली कमी वयात पीएचडी पुर्ण करणारी पहिली महिला
जखमी जेनेलियाचा ‘वाथी कमिंग’ गाण्यावर तुफान राडा, रितेश आणि मित्रांचा मजेदार डान्स; पहा व्हिडीओ
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.