मल्ल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत सुपरस्टार आहेत मोहनलाल; बुर्ज खलिफामध्ये आहे घर

तेलगू आणि तामिळ फिल्म इंडस्ट्रीसोबतच मल्ल्याळम इंडस्ट्री देखील चित्रपटांच्या बाबतीत खुप पुढे जात आहे. मल्ल्याळम इंडस्ट्रीने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट आणि सुपरस्टार्स जगाला दिले आहेत. अशाच एका सुपरस्टारबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या सुपरस्टारचे ना आहे मोहनलाल.

मल्ल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून मोहनलालला ओळखले जाते. त्यांच्या चाहता वर्ग सगळ्या भारतामध्ये आहे. मोहनलाल ६१ वर्षांचे झाले आहेत. ६१ व्या वर्षी देखील मोहनलाल त्यांच्या लुक्सने आणि फिटनेसने तरुण अभिनेत्यांना देखील चांगलीच टक्कर देतात.

१९७८ मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या मोहनलालने त्यांच्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत ३५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. म्हणून ते इंडस्ट्रीतील सर्वात महागडे अभिनेते आहेत.

मोहनलालचा जन्म २१ मे १९६१ ला केरळमध्ये झाला होता. त्यांचे पुर्ण नाव मोहनलाल विश्वनाथ नायर आहे. त्यांचे वडील वकील होते. तर आई गृहीणी. पण मोहनलालला मात्र अभिनयात रुची होती. पण अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याअगोदर मोहनलाल स्टेट रेसलिंग चैपियनशिप देखील जिंकली होती.

मोहनलाल ज्यावेळी १८ वर्षांचे होते. त्यावेळी त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांचा पहीला चित्रपट कधीच रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर १९८० मध्ये त्यांचा पहीला चित्रपट रिलीज झाला आणि हिट झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीले नाही. एकापेक्षा एक हिट चित्रपट त्यांनी केले.

मोहनलाल मल्ल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एकमेव असे स्टार आहेत ज्यांच्या नावावर सर्वाधिक हिट चित्रपट आहेत. त्यामूळेच त्यांचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांनी अभिनय केलेला प्रत्येक चित्रपट चाहत्यांना खुप आवडतो. मोहनलालने आत्तापर्यंत इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

मोहनलालच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी १९८८ मध्ये सुचित्रसोबत लग्न केले होते. सुरुवातीला सुचित्रा मोहनलालची खुप मोठी फॅन होती. हळूहळू मोहनलाल देखील तिच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. मोहनलालने त्यांच्या फॅनसोबत लग्न केले आहे असे बोलले तरी त्यात काही वावगे नाही.

मोहनलाल आणि सुचित्रा यांना एक मुलगा प्रणव आणि मुलगी विस्मया आहे. त्यांचा मुलगा अभिनेता आहे. तर मुलगी अभिनय क्षेत्रापासून दुर राहून दुसऱ्या क्षेत्रात करिअर करत आहे. मोहनलाल इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेते आहेत. त्यामूळे त्यांची लाइफस्टाईल देखील खुपच श्रीमंत आहे.

मोहनलाल करोडोंच्या संपत्तीचे मालक आहे. भारतासोबतच भारता बाहेर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. दुबईत बुर्ज खलिफामध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत ३१८ करोड आहे. त्यासोबतच त्यांना महागड्या गाड्यांची देखील आवड आहे. ज्यामूळे मोहनलालचे चाहते नेहमीच वाढत असतात.

महत्वाच्या बातम्या –
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
ऐश्वर्या रॉय, काजल अग्रवाल, अनुष्का शर्मा यांच्या दागिन्यांची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या…
…म्हणून चार दिवस मी घरातून बाहेर नव्हते पडले; राधिका आपटेने सांगितला न्युड व्हिडिओचा अनुभव
‘इंडिअन आयडल १२’ शोमधून नेहा कक्कड बाहेर; कारण ऐकून धक्का बसेल 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.