सट्टेबाजीत ३० लाखांचं नुकसान झाल्यानंतर तारक मेहतामधील ‘हा’ बडा अभिनेता बनला चोर

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. राज्यात देखील आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. सर्वच घटकांना कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. या काळात हाताला काम नसल्याने सर्वसामान्य जनतेसोबतच कलाकारांना देखील मोठा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतं आहे.

तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मालिकेच्या सेटवरून एकामागोमाग एक बातम्या येत आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करणाऱ्या एका कलाकाराने गेल्या काही दिवसांत सट्टेबाजीत ३० लाख रुपये गमावले आहेत आणि या ३० लाखांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने चक्क आता चोरीचा मार्ग अवलंबला आहे.

दरम्यान, मिराज असे या अभिनेत्याचे नाव असून त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम केले आहे. या अभिनेत्याला सोन्याची साखळी चोरताना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिराज हा जुनागडचा रहिवाशी असून निर्मनुष्य ठिकाणी महिलांना लक्ष्य करून तो आणि त्याचा साथीदार सोनसाखळी चोरत असत. त्याने त्याच्या आरोपांची कबूली दिली असून नुकसान झाल्यामुळे त्याने अनेक चोऱ्या केल्या असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

अमित शहांना नक्षलवाद्यांचे पत्रकातून थेट आव्हान; ‘कोणा-कोणाचा सूड घेणार?’

‘चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?’

‘जनतेने १०० टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी द्यावी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.