अभिनेते ज्युनियर मेहमूदने राजेश खन्नाबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले ते तर…

बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार समजले जाणारे राजेश खन्ना आज आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांचे चित्रपट आणि आठवणी सदैव आपल्यासोबत असणार आहेत. त्यांचे अनेक किस्से खुप प्रसिद्ध होत असतात. असाच एक किस्सा अभिनेते मेहमूदने सांगितला होता.

७० च्या दशकामध्ये त्यांचे स्टारडम सर्वाधिक होते. त्यांच्यासारखे स्टारडम दुसऱ्या कोणत्याही कलाकाराने परत पाहिले नाही. घर असो किंवा चित्रपटाचे सेट राजेश खन्ना त्यांच्या रुबाबात असायचे.

त्याकाळी इंडस्ट्रीतील अनेक मोठे कलाकार आणि निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या तारीख मिळवण्यासाठी तासनतास वाट बघायचे. काकांसोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार ज्युनियर मेहमूदने त्यांच्याबद्दल अनेक खुलासे केले होते.

मेहमूद म्हणाले की, ‘त्याकाळी राजेश खन्नाचा बंगला आशिर्वादमध्ये अनेक मोठे कलाकार त्यांना भेटण्यासाठी वाट बघत होते. इंडस्ट्रीतील मोठे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या घरी त्यांना भेटायला जायचे. त्यामुळे त्यांच्या घरातील नजारा खुप वेगळा असायचा’.

मेहमूदने पुढे सांगितले की, ‘राजेश खन्नाच्या घरात जसा हॉल होता. तसा हॉल दुसऱ्या कोणत्याही घरात मी पाहिला नाही. त्या हॉलमध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी बसण्याची व्यवस्था खुप भारी होती. कोणीही आले तरी त्यांना खाली जमिनीवर बसावे लागायचे’.

पाहूणे आल्यानंतर राजेश खन्ना दरवाज्यातून हॉलमध्ये एन्ट्री घ्यायचे आणि थोडेश्या उंचीवर जाऊन बसायचे. कोणत्याही मोठ्या निर्मात्यांसोबत मिटिंग असली तरी राजेश खन्ना कुर्ता आणि सिल्कची लुंगी घालायचे.

सर्व पाहुण्यांचे स्वागत काका स्वतः करायचे. त्यासोबतच ज्युनियर मेहमूदने सांगितले की, राजेश टोपे खुप मिडी व्यक्ती होते. त्यांचा मुड चांगला असेल तर ते सर्वांशी चांगले वागायचे. नाही तर घरात वादळ यायचे. राजेश खन्नाच्या स्वभावाचे अनेक मजेदार किस्से प्रसिद्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या –

गोविंदा नसते तर अजय देवगन बॉलीवूड सोडून घरी बसले असते; वाचा पुर्ण किस्सा

‘लावारिस’ चित्रपट पाहील्यानंतर राजेश खन्ना म्हणाले की, थोड्या पैशांसाठी अमिताभ काहीही करु शकतो

कंगणा करणवर भडकली, म्हणाली सुशांतसारखं कार्तिकला गळफास घ्यायला भाग पाडू नकोस

एकेकाळी मुंबईच्या चाळीत सिंगल रुममध्ये राहणाऱ्या पंकज त्रिपाठीने आज मुंबईमध्ये खरेदी केले करोडोंचे घर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.