‘हम काले हुए तो क्या हुआ’ गाण्यामूळे मनोज कुमार आणि मेहमूदमध्ये झाले होते मोठे भांडण

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुपरस्टार झाले आहेत. प्रत्यक स्टार कोणत्या ना कोणत्या कारणामूळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातो. असेच एक स्टार म्हणजे मनोज कुमार. अनेक वर्ष त्यांनी बॉलीवूडमध्ये राज्य केले आहे.

मनोज कुमारचा अभिनय दमदार होता. म्हणून ते कमी वेळातच स्टार बनले होते. अभिनयामूळे चर्चेत असणारे मनोज कुमार त्यांच्या खऱ्या आयूष्यात मात्र खुप शांत होते. त्यांच्या शांत स्वभावाने अनेकदा अडचणी निर्माण व्हायचे.

शांत स्वभाव असल्यामूळे त्यांचे नाव वादविवादांपासून दुर होते. पण नेहमीच दुर होते असे नाही. अनेक अभिनेत्यांसोबत त्यांचे पटत नव्हते. असेच एक कलाकार म्हणजे मेहमूद. मेहमूद आणि मनोज कुमारचे कधीच पटले. एकदा तर मेहमूदने मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली होती. जाणून घेऊया हा पुर्ण किस्सा.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहमूद एकमेव कॉमेडियन होते. ज्यांना चित्रपटांमध्ये अभिनेत्यांपेक्षा जास्त पैसे दिले जायचे. मेहमूद यांचे पुर्ण कुटूंबच फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते. म्हणून त्यांना किंवा त्यांच्या कुटूंबाला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

आजही बॉलीवूडमध्ये मेहमूद यांची जागा कोणताही कॉमेडियन किंवा अभिनेता घेऊ शकला नाही. कारण त्यांच्यासारखी कॉमेडी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला जमू शकली नाही. त्यांचा कॉमेडी टाईमिंग अप्रतिम होता. त्यांचा प्रत्येक विनोद आणि त्यांचे हावभाव लोकांना पोट पकडून पकडून हसायला लावायचे.

अभिनयात आपल्या नावाचा शिक्का चालवणारे मेहमूद नेहमीच दुसऱ्या कलाकारांच्या निशाण्यावर असायचे. चित्रपटामध्ये हिरोपेक्षा जास्त महत्व मेहदमूला असायचे. मनोज कुमारला मेहमूद आवडत नव्हते. मेहमूदच्या स्टारडममूळे मनोज कुमार खुप जास्त चिडायचे.

‘गुमनाम’ चित्रपटामध्ये मेहमूद आणि मनोज कुमार एकत्र काम करत होते. चित्रपटाची शुटींग सुरु झाल्यानंतर दोन्ही कलाकारांमध्ये वाद लोकांसमोर आहे. मेहमूदच्या स्टारडममूळे दिग्दर्शक हिरोच्या अगोदर त्यांच्यावर गाणं बनवायचे आणि चित्रपटात टाकायचे.

१९६५ साली रिलीज झालेल्या गुमनाम चित्रपटात देखील मेहमूदसाठी एक खास गाणं लिहीण्यात आले होते. ‘हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले है’ असे गाण्याचे बोल होते. ही गोष्ट मनोज कुमारला समजताच ते चिडले.

चित्रपटात हिरोपेक्षा जास्त लक्ष मेहमूदकडे देण्यात येत आहे. ही गोष्ट त्यांना पटली नाही. या कारणामूळे मनोज कुमार सेटवर उशीर जाऊ लागले. अनेकदा ते सेटवर जायचे आणि लगेच परत यायचे. त्यांच्या शुटींग पुर्ण करायला त्रास होऊ लागला.

मेहमूदला समजले की, मनोज कुमार त्या गाण्यामूळे चिडले. त्यांनी दिग्दर्शकांना चित्रपटातून ते गाणं काढून टाकायला सांगितले आहे. पण दिग्दर्शक तयार नाहीत. सुरुवातीला मेहमूदने खुप प्रेमाने मनोज कुमारला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ते मात्र काहीही ऐकायला तयार नव्हते.

दोन्ही कलाकारांमधले वाद दिवसेंदिवस वाढत होते. एक दिवस चिडलेल्या मेहमूदने सेटवरील सगळ्या लोकांसमोर मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली. त्यामूळे त्यांचा खुप मोठा अपमान झाला. पण काही दिवसांनी त्यांना चुक समजली. चित्रपटाच्या रिलीजनंतर मेहमूदचे गाणे सुपरहिट झाले होते. आजही लोकं ते गाणं ऐकतात.

महत्वाच्या बातम्या –
११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे
…म्हणून आज चित्रपटांपासून दुर राहून मालिकांमध्ये काम करत आहे अभिनेत्री ग्रेसी सिंग
संजय दत्तच्या मुलींच्या सवयीला वैतागून सुनील दत्तने सोडले होते घर
एकेकाळी खुप गरीब होते अनिल कपूर; अनेक दिवस राज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते अनिल कपूरचे सगळे कुटूंब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.