३१ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत अभिनेत्याने केले लग्न

आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे योग्य जोडीदार शोधून लग्न करणे. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात. अभिनेते, अभिनेत्री मोठ्या थाटात विवाह करत असतात. लग्नानंतर काही कारणांमुळे त्यांच्यात घटस्फोट होत असतो. त्यानंतर पुन्हा दूसरा जोडीदार शोधून विवाहबध्द होतात.

‘घोस्ट रायडर’ या चित्रपटात भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता निकोलस केज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. निकोलस केजने एकदा दोनदा नव्हे तर तब्बल पाचव्यांदा लग्न केले आहे. निकोलस याचे वय ५७ वर्ष आहे आणि त्याच्यापेक्षा ३१ वर्षांनी लहान असलेल्या मूलीशी त्याने विवाह केला आहे.

 

१६ फेब्रूवारी दिवशी निकोलस याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यादिवशीच वडिलांच्या स्मरणार्थ निकोलस याने त्याची २६ वर्षांची जपानी गर्लफ्रेंड रिको शिबरासोबत मोठ्या थाटात लग्न केले आहे. लग्नानंतर निकोलस आणि रिको शिबरा यांनी सेलिब्रेशन केलं होते. त्यामध्ये निकोलस याची पत्नी ऐलिस आणि त्यांचा मुलगा उपस्थित होता.

ऐलिस यांच्यासोबत निकोलस याने घटस्फोट घेतला आहे. तरीही अजूनही दोघेजण चांगले मित्र आहेत. सोशल मिडियावर सध्या दोघांच्या लग्नाची चर्चा सूरू आहे. अनेकांनी त्यांना सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

निकोलस केज हा अमेरिकेतील मोठा अभिनेता आहे. अभिनयाबरोबचं चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आहे. रेसिंग विथ दी मुन, हनीमून इन वेगास, घोस्ट रायडर, रेसिंग एरिजोना या इंग्लिश चित्रपटांमध्ये त्याने भूमिका निभावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
चाहत्यांनी तैमूरला दिला आवाज, अन् त्याने जे केले ते पाहून करीना चांगलीच संतापली, पाहा व्हिडिओ
गावठी मुलाच्या डान्सने वेड लावले जान्हवी कपूरला, फिदा होत म्हणाली माझ्यासोबत एक दिवस घालवशील का?
५७ वर्षीय अभिनेत्याने २६ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत मोठ्या थाटात केले पाचवे लग्न
तैमूर गाडीतून उतरताच भडकला, आणि थेट काचेवर जाऊन धडकला, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.