संजय दत्तच्या बहीणीसोबत लग्न करण्याअगोदर कपूर कुटूंबाचे जावई होणार होते कुमार गौरव; ‘या’ कारणामूळे तुटले लग्न

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये धमाका केला होता. पण त्यानंतर मात्र ते त्यांच्या करिअरमध्ये काही खास कमाल करु शकले नाहीत. या लव्ह स्टोरी फेम अभिनेता कुमार गौरवचा देखील समावेश होतो. कुमार गौरवला वन टाईम वंडर बोलले जाते.

प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमारचा मुलगा कुमार गौरवने पहील्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. फिल्म इंडस्ट्रीला त्यांचा नवीन सुपरस्टार भेटल्याचे बोलले जात होते. ८० च्या दशकात कुमार गौरवला चॉकलेट बॉय बोलले जात होते.

पण कुमार गौरव मात्र वडीलांप्रमाणे जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये राहू शकले नाहीत. त्यांना वन फिल्म स्टारचा किताब देण्यात आला. फिल्मी पडद्यावर कुमार गौरवची लव्ह स्टोरी हिट झाली असली तरी खऱ्या आयूष्यात मात्र त्यांना सहजासहजी प्रेम मिळाले नाही.

कुमार गौरवने संजय दत्तची बहीण नम्रता दत्तसोबत लग्न केले. नम्रतासोबत लग्न होण्याअगोदर दोन वेळा त्यांचे मन तुटले होते. सध्या ते फिल्म दुनियेपासून दुर राहून त्यांचा बिजनेस सांभाळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कुमार गौरवच्या आयूष्याबद्दल काही रोचक गोष्टी.

कुमार गौरव आज भलेही नम्रता दत्तचे पती असले तरी एकेकाळी ते कपूर कुटूंबाचे जावई होणार होते. ही गोष्ट खुप कमी लोकांना माहीती असेल. पण ही गोष्ट खरी आहे. कुमार यांचे लग्न राज कपूरच्या मुलीसोबत होणार होते. दोघांच्या लगनाची तयारी झाली होती. पण हे लग्न होऊ शकले नाही.

राज कपूर आणि राजेंद्र कुमार खुप चांगले मित्र होते. कुमार गौरवचा पहीला चित्रपट हिट झाला. त्यावेळी या दोघांनी त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नात्यात करण्याचा निर्णय घेतला. राज कपूरची मुलगी रीमा कपूरसोबत कुमार गौरवचे लग्न ठरवण्यात आले.

दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण हे नातं जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांचे नाते तुटण्यामागचे कारण अभिनेत्री विजयता पंडितला ठरवले जाते. विजयता आणि कुमार गौरवने लव्ह स्टोरी चित्रपटात एकत्र काम केले होते. शुटींगच्या दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत होत्या.

रिमा कपूरसोबत साखरपुडा झाल्यानंतर देखील कुमार गौरव आणि विजयता पंडीतचे अफेअर सुरु होते. हिच गोष्ट रिमाला खटकली आणि तिने साखरपुडा तोडला. कुमार गौरवला विजयतासोबत लग्न करण्याची इच्छा होती. पण त्यांच्या घरच्यांनी या लग्नाला कधीच परवानगी दिली नाही.

त्यामूळे कुमार गौरवने नम्रता दत्तसोबत लग्नाचा निर्णय घेतला. नम्रता आणि कुमार गौरव एकमेकांचे खुप चांगले मित्र होते. त्यामूळे दोन्ही कुटूंबाने देखील दोघांच्या नात्यावर आक्षेप न घेता लग्नाला परवानगी दिली. १९८४ मध्ये कुमार गौरव आणि नम्रताचे लग्न झाले.

लग्नानंतर कुमार गौरव जास्त चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. काही दिवसांमध्येच त्यांनी इंडस्ट्री सोडली आणि स्वत चा व्यवसाय सुरु केला. कुमार गौरवचे संजय दत्तसोबत देखील खुप चांगले नाते आहे. सध्या ते लाइमलाईटपासून दुर राहून बिजनेस सांभाळत आहेत.

महत्वाच्या बातम्या –
विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम
घटस्फोटानंतरही अभिनेत्री पुजा बेदी आहे तब्बल ‘एवढ्या’ करोडची मालकिण; जाणून घ्या..
‘राज’ चित्रपटातील अभिनेता आज करतो ‘हे’ काम; विश्वास बसणार नाही
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.