चित्रपटसृष्टी हळहळली! ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्करांचे कोरोनाने निधन

मुंबई | मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वास्तव चित्रपटात दीड फुट्याच्या वडिलांची भूमिका निभावलेले मराठी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोर नांदलस्कर यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक भूमिका निभावल्या आहेत. किशोर नांदलस्कर लहानाचे मोठे मुंबईतच झाले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राकडे वाटचाल केली.

नांदलस्कर यांनी ४० नाटके, २५ पेक्षा जास्त मराठी चित्रपट, २० पेक्षा अधिक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती.  हळद रूसली कुंकू हसलं, वास्तव चित्रपटातील दीड फुट्याचे वडील, जिस देश में गंगा रहता है चित्रपटात सन्नाटाची भूमिका त्यांनी गाजवली होती.

भ्रमाचा भोपळा, पाहूणा, चल आटप लवकर, वन रूम किचन यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हलचल, सिंघम, वास्तव, हळद रूसली कुंकू हसलं, तेरा मेरा साथ है, खाकी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या आहेत.

किशोर नांदलस्कर सध्या मुंबईतील बोरीवली परिसरात राहत होते. नांदलस्कर यांना विनोदी भूमिका करणारा नट म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘चाचा विधायक है हमारे’; तन्मयच्या लसीकरणानंतर फडणवीसांना केले लोकांनी ट्रोल, मीम्स होताय व्हायरल
दिलासादायक! आता राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढणार नाही, तज्ञांनी सांगितले कारण, जाणून घ्या
रेल्वे रुळावर चिमुकला तोल जाऊन पडला; रेल्वे कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत वाचवले प्राण, पाहा व्हिडिओ

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.