‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका फार लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर(Akshya Devdhar) यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साखरपुडा करत त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.(actor hardik joshi and actress akshya devdhar video viral on social media)
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर सध्या लंडनमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. लंडनमधील त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अक्षया देवधर होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीची कॉलर पकडताना दिसून येत आहे.
‘लगीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येतो. या व्हिडिओमध्ये सुरवातीला अभिनेता हार्दिक जोशी नितीश चव्हाणला म्हणतो की, “बघ मित्रा पितळेला घासून ते कधीच सोनं बनू शकत नाही. त्यानंतर नितीश चव्हाण तुम्ही असं का म्हणता? असे हार्दिकला विचारतो.
त्यावर अभिनेता हार्दिक जोशी उत्तर देताना म्हणतो की, माझी बायको ब्युटी पार्लरमध्ये गेली आहे. त्यावेळी अचानक अभिनेत्री अक्षया देवधर त्या ठिकाणी येते. अक्षयाला पाहताच नितीश चव्हाण त्या ठिकाणाहून पळ काढतो. त्यानंतर अभिनेत्री अक्षया देवधर हार्दिक जोशीकडे रागाने बघते आणि त्याची कॉलर पकडते.
अभिनेता हार्दिक जोशीने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच अभिनेता नितीश चव्हाणने देखील हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेता नितीश चव्हाणने ‘हिम्मतवाला’ असे लिहिले आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
अनेकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. अनेक युजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “अंजलीबाईंनी हानल दोगाणं पण.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “राणादा आता मार खाणार.” अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत. ते नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदे गोत्यात, मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार? न्यायालयाने दिला दणका
ग्लोबल टिचर डिसले गुरूजींना धक्का! राजीनामा दिला तरी आतापर्यंतच्या पगाराची वसूली होणार
उद्धव ठाकरेंना भाजपचा आणखी एक धक्का; राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंना मंत्रीपदाची ऑफर