चित्रपटांमध्ये रेप सीन केल्यामूळे खलनायकाच्या आई वडीलांनी त्याच्याशी तोडले होते सगळे नाते

बॉलीवूड चित्रपट दोन गोष्टींमूळे चालतात. पहीले म्हणजे हिरो आणि दुसरी म्हणजे खलनायक. या दोघांशिवाय कोणताही हिंदी चित्रपट पुर्ण होऊ शकत नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी त्यांच्या खलनायकाच्या भुमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

असेच एक अभिनेते म्हणजे रणजित. आजही त्यांचे नाव इंडस्ट्रीतील सर्वात खतरनाक खलनायकांच्या यादीत सामील होते. चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना सर्वाधिक परेशार त्यांनीच केले आहे. म्हणूनच ते आजही लोकं त्यांच्या नावाने घाबरतात.

रणजित यांचे खरे नाव गोपाल बेदी होते. गोपाल नाव असल्यामूळे त्यांना लोकं गोली बोलायचे. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदरच त्यांचे नाव बदलून घेतले होते. कारण गोपाल हे नाव इंडस्ट्रीतील वाटत नव्हते. गोपाल नावामूळे त्यांना अभिनेता असल्यासारखे वाटत नव्हते. म्हणून त्यांनी नावात बदल केला.

७० आणि ८० च्या दशकामध्ये रणजितने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. त्यांची एन्ट्री एवढी धमाकेदार झाली की, त्यांना खलनायकांच्या यादीत स्थान मिळाले. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘शर्मिली’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर त्यांनी नॅशनल डिफेन्स ऑकॅडमीसाठी फॉर्म भरला होता. त्यात त्यांचे सिलेक्शन देखील झाले होते. ज्यावेळी रणजित ट्रेनिंग घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या ट्रेनरच्या मुलीवर फिदा झाले होते. ही गोष्ट तिथल्या लोकांना समजल्यानंतर त्यांना बाहेर काढून टाकण्यात आले.

त्यानंतर रणजित मुंबईला आले आणि त्यांनी सुपरस्टार देवानंदचे चित्रपट पाहीले. हे चित्रपट पाहून त्यांना अभिनयात रुची निर्माण झाली. म्हणून त्यांनी बॉलीवूडकडे मोर्चा वळवला. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना सर्वात जास्त मदत सुनील दत्त यांनी केली.

बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीले नाही. रणजितने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले. मोठ्या मोठ्य सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केले. त्यांचा अभिनय पाहून लोकं त्यांना घाबरत होते. अभिनेत्री तर त्यांच्यासोबत काम करायला घाबरायच्या.

रणजित बॉलीवूडच्या अशा खलनायकांपैकी एक आहेत ज्यांना लोकं घाबरत होती. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यातल्या ५० चित्रपटांमध्ये त्यांनी रेप सीन केले होते. तर २५ चित्रपटांमध्ये रणजितला त्यांच्या खऱ्या नावाने कास्ट करण्यात आले होते.

रणजितने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मी माझे अनेक चित्रपट पाहीले नाहीत. कारण ते चित्रपट पाहून माझ्या घरच्यांनी माझ्याशी नाते तोडले होते. आई वडील माझ्याशी बोलत नव्हते. ते मला म्हणायचे की, तु खुप वाईट काम करतोस म्हणून आम्हाला तुमच्याशी काहीही नातं ठेवायचे नाही’. रणजित आज चित्रपटांपासून लांब आहेत. पण लोकांच्या मनातील त्यांची दशहत आजही कायम आहे.

महत्वाच्या बातम्या –
विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम
सैराटफेम आर्चीच्या मनात आहे ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; म्हणतीय त्याच्यासोबत डेटवर जायचंय
घटस्फोटानंतरही अभिनेत्री पुजा बेदी आहे तब्बल ‘एवढ्या’ करोडची मालकिण; जाणून घ्या..
‘या’ कारणामूळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा होणार होते वेगळे; नात्यात आला होता कडूपणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.