..आणि त्याने आपल्या सर्व मित्रांना घरी बोलावले व सर्वांना ७-७ कोटी रूपये दिले, वाचा मैत्रीची अनोखी कहाणी

हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनी जगातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेता होण्याबरोबरच जॉर्ज एक चित्रपट निर्माता-दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि एक चांगला माणुसदेखील आहे. 3 गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि 2 ऑस्कर पुरस्कार विजेते जॉर्ज क्लूनी यांना 2018 मध्ये एएफआय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

६० वर्षीय जॉर्ज क्लूनी यांनी १९७८ मध्ये दूरचित्रवाणीद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर, 1994 ते 1999 या काळात टेलिव्हीजन नाटक मालिका ER मध्ये डॉ.डॉग रॉसच्या भूमिकेत यश मिळवल्यानंतर, त्यांना 1996 मध्ये हॉलीवूडचा ऍक्शन चित्रपट From Dusk till Dawn मध्ये मुख्य भूमिका मिळाली.

यानंतर, जॉर्ज क्लूनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये सतत काम करून एक मोठे हॉलीवूड स्टार बनले. जॉर्ज क्लूनी यांचा जन्म 6 मे 1961 रोजी अमेरिकेतील लेक्सिंग्टन येथे झाला. जॉर्ज अत्यंत साध्या कुटुंबातील होते. जॉर्जचे काही मित्रही शाळेच्या काळात त्यांना मदत करायचे.

1975 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा लॉस एंजेलिसला आले तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. आज ते कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहे. पण त्यांच्याबद्दल आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती ऐकून तुम्हाला त्यांचा आणखी अभिमान वाटेल भलेही ते हॉलिवूडचे स्टार असतील.

जॉर्ज क्लूनी यांची माणुसकी
वर्ष 2013 मध्ये एक दिवस, जॉर्ज क्लूनीने त्यांच्या 14 जवळच्या मित्रांना बोलावले आणि म्हणाले, 27 सप्टेंबर 2013 ची तारीख नोंदवा, कारण त्या दिवशी तुम्हाला सर्वांना माझ्या घरी यायचे आहे. त्यांचे हे 14 मित्र वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीतून जात होते.

काही श्रीमंत होते, काही गरीब. 27 सप्टेंबर रोजी जेव्हा हे सर्व 14 मित्र जॉर्जच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना एका टेबलवर 14 चकाकणाऱ्या सूटकेस दिसल्या. सर्वांना आश्चर्य वाटले की या सूटकेसमध्ये काय आहे? या दरम्यान जॉर्ज क्लूनी म्हणाले, ‘जेव्हा मी लॉस एंजेलिसला आलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते.

मला तुम्ही आसरा दिला होता. मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुम्ही लोक माझ्यासाठी देवदूत म्हणून आलात. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय मी कदाचित इतका यशस्वी झालो नसतो. म्हणूनच मला आज तुमच्या सर्वांना काहीतरी भेट द्यायची आहे.

मला माहित आहे की आपण कठीण काळातून गेलो आहोत. तुमच्यापैकी काही अजूनही कठीण काळातून जात आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाची आणि तुमच्या कर्जाची चिंता करण्याची गरज नाही. आता तुमची सर्व संकटे दूर होणार आहेत.

तुम्ही सर्वांनी पटकन तुमची सूटकेस उघडा, कारण प्रत्येक सुटकेसमध्ये तुमच्या सर्वांसाठी 1-1 दशलक्ष डॉलर्स (7 कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहेत. या दरम्यान या 14 मित्रांपैकी एकाने पैसे घेण्यास नकार दिला, तेव्हा क्लूनी म्हणाला, ‘एकतर तुम्ही सर्व पैसे घ्याल, किंवा कोणीही घेणार नाही. मग कोणताही संकोच न करता शेवटी सर्वांना हे पैसे घ्यावे लागले.

जॉर्ज क्लूनी केवळ त्यांच्या मित्रांना आणि जवळच्या लोकांना मदत करण्यासाठीच नव्हे तर गरजूंना मदत करण्यासाठी देखील ओळखले जातात. दरवर्षी ते आपल्या कमाईचा मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात. जॉर्ज अनेक संस्थांशीही संबंधित आहे.

असे खुप कमी कलाकार आहेत जे समाजकार्य करतात. भारतातील काही अभिनेतेही समाजकार्यात आपला हातभार लावत असतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
दोन शेंड्या बांधणाऱ्या रणवीर सिंहची आगळीवेगळी अदा!! फोटो पाहून चाहते झाले फिदा…
विजय देवराकोंडाने दिलेला शब्द पाळला, इंडियन आयडलच्या शन्मुखप्रिला लाइगरमध्ये गाणं गाण्याची संधी
मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना क्लीनचीट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.