शिल्पा शेट्टीला जबरदस्ती किस केल्यामुळे अडचणीत आला होता अभिनेता; वाचा पुर्ण किस्सा

शिल्पा शेट्टी फिल्म इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही लोकं तिच्या सौंदर्यावर तेवढेचं फिदा आहेत जेवढे नव्वदच्या दशकात होते. कारण शिल्पाने स्वतःला अतिशय उत्तम पद्धतीने फिट ठेवले आहे. तिच्याकडे बघून तिचे वय लोकांना कळत नाही.

४५ वर्षांची शिल्पा शेट्टी फिगरच्या बाबतीत बॉलीवूडच्या नवनवीन अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देते. तिची फिगर अनेकांसाठी प्रेरणा आहे. शिल्पाच्या आरोग्याचे रहस्य म्हणजे योगा. शिल्पा रोज न चुकता योगा करते.

त्यामुळेच ती सुंदर आणि फिट दिसते. शिल्पाच्या योगाच्या अनेक सीडी या आणि डिव्हिडी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. बाबा रामदेव यांच्यासोबत योगा करणारी शिल्पा एकमेव अभिनेत्री आहे. त्यामुळेच आजही तिचे लाखो दिवाने आहेत.

फक्त बॉलीवूडच नाही तर बॉलीवूडच्या बाहेर देखील ती शिल्पाचे करोडो चाहते आहेत. हॉलीवूडमध्ये देखील तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. एका हॉलीवूड अभिनेत्याने तर चक्क सगळ्या लोकांसमोर शिल्पाला किस केले होते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

त्यावेळी या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली होती. सगळ्या मीडियामध्ये शिल्पा आणि त्या अभिनेत्याची चर्चा रंगली होती. शेवटी त्या अभिनेत्याला समोर येऊन माफी मागावी लागली. तेव्हा हे प्रकरण शांत झाले. नाही तर हे प्रकरण सरळ कोर्टात जाणार होते.

महत्त्वाचे म्हणजे तो अभिनेता कोण होता? ज्याच्यामूळे हे सगळं काही झालं होतं. जाणून घेऊया त्या अभिनेत्याबद्दल. त्या अभिनेत्याचे नाव होते रिचर्ड गेअर. रिचर्ड हॉलीवूडचे खुप मोठे अभिनेते आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रिचर्ड एका कार्यक्रमासाठी भारतात आला होता. त्यासोबतच तो चित्रपटाचे प्रोमोशन करायला देखील आला होता. याच कालावधीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. तिथे लाखो लोकं उपस्थित होते. म्हणून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी शिल्पा शेट्टीला बोलवण्यात आले होते.

शिल्पा शेट्टीला ज्यावेळी स्टेजवर बोलवण्यात आले त्यावेळी मात्र रिचर्ड तिला बघून पागल झाला. त्याने पुढचा मागचा विचार न करता शिल्पाला सगळ्यांसमोर जबरदस्ती किस केले. शिल्पासोबतच तिथे उपस्थित असणारे सगळे लोकं शॉक झाले.

पण त्यावेळी शिल्पाने ही गोष्ट हसण्यात नेली आणि ती काहीही बोलली नाही. ही गोष्ट लोकांना मात्र अजिबात आवडली नाही. त्यांनी हे प्रकरण वाढवलं. लोकं खुप भडकली. मीडियामध्ये देखील या गोष्टीची खुप जास्त चर्चा झाली.

हे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच गेले. लोकांनी या प्रकरणाला कोर्टात नेण्याचा निर्णय घेतला. शेवटी घाबरून रिचर्डने मीडियासमोर शिल्पा आणि लोकांची माफी मागितली. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. पण हा खुप मोठा चर्चेचा विषय होता.

महत्वाच्या बातम्या –

गर्लफ्रेंड घरी यायची आणि पत्नीसोबत मिळून माझ्यासाठी जेवण बनवायची; रवी किशनचा गौप्यस्फोट
‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेतील ओमचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खुपच आलिशान; पहा फोटो
गेल्या महिन्याभरापासून घरी बसून आहेत नट्टूकाका, शुटींगला बोलवण्यात येत नाही; कारण…
अक्षय कुमार होता काजोलचा पहीला क्रश; पार्टीमध्ये त्याला शोधत बसायची अभिनेत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.