भयानक अपघातात बॉलीवूड अभिनेते महावीर शाहचा आणि त्यांच्या कुटुंबाचा झाला होता मृत्यू

३१ ऑगस्ट २००० मध्ये अमरिकेत एका मोठा अपघात झाला होता. या अपघातात रस्त्याने जाणाऱ्या कारला एका दुसऱ्या कारने खुप जोरदार टक्कर दिली होती. म्हणून त्या कारमध्ये असणाऱ्या माणसांचा मृत्यू झाला होता.

तरीही या अपघातात एका माणसाचा जीव वाचला होता. तो माणूस कारमधून बाहेर येऊन उभा राहिला होता. तेवढ्यात दुसरी कार आली आणि कारने त्या माणसाला टक्कर दिली. या अपघातात त्या माणसाचा जागीच मृत्यू झाला होता. यामुळे भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये खुप जास्त खळबळ उडाली होती.

कारण त्या अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते महावीर शाह होते. त्यांनी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा मृत्यू देखील अतिशय फिल्मी होता.

महावीर शाह दोन महिन्यांसाठी त्यांच्या कुटुंबासोबत अमेरिकेत फिरायला गेले होते. पण ते परत आले नाही. त्यांचा तिथेच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू फिल्म इंडस्ट्रीतील लोकांसाठी खूप मोठा धक्का होता. त्यांच्या शेवट अतिशय वाईट झाला होता.

महावीर शाह फिल्म इंडस्ट्रीतील एक असे अभिनेते होते. ज्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त नकारात्मक भुमिका केल्या होत्या. पण तरी देखील एखाद्या हिरोप्रमाणे त्यांचे देखील अनेक चाहते होते.

महावीर शाहने १९७७ मध्ये आलेल्या ‘अब क्या होगा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. या चित्रपटात त्यांची भुमिका खुप छोटी होती. पण त्याच थोड्या वेळात त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. म्हणून त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.

चित्रपटांमध्ये येण्याअगोदर महावीर शाह नाटकांमध्ये काम करत होते. त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले होते. त्यांचे नाटकांमध्ये खुप जास्त नाव होते. म्हणून त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळत होते.

जन्मदाता, खेल, सखाराम बिंदर आणि साथीसारख्या अनेक प्रसिध्द नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते. अभिनयासोबतच त्यांनी नाटकांचे दिग्दर्शन देखील केले होते. म्हणून त्यांना दिग्दर्शनात देखील खूप जास्त रुची होती.

८० आणि ९० च्या दशकात त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपटांमध्ये सर्वाधिक भुमिका पोलीस इन्स्पेक्टरच्या निभावल्या होत्या. शफी इनामदारनंतर त्यांनी सर्वाधिक पोलीस इन्स्पेक्टरच्या भुमिका निभावल्या होत्या.

त्यांच्या भुमिका चित्रपटांमध्ये खुप छोट्या होत्या. पण त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ८० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच १०० पेक्षा अधिक नाटकांमध्ये भुमिका निभावल्या आहेत.

त्यांनी अंकुश, आखरी अदालत, दयावान, तेजाब, ठाणेदार, १०० डेज, नरसिंम्हा, बेनाम बादशहा, शोला और शबनम, आ गले लग जा, राजा बाबू, बादशहा, क्यूकी मै झुट नही बोलता यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महावीर शाह बॉलीवूडच्या अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या या टॅलेंटचा वापर फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी करून घेतला नाही. त्यांना चांगल्या भुमिका मिळाल्या असत्या. तर आज महावीर शाह बॉलीवूडच्या खतरनाक खलनायकांपैकी एक असते.

महत्त्वाच्या बातम्या –

आमिषा पटेलचे करिअर खराब करण्यासाठी करीना कपूरने केले होते ‘हे’ काम

फिल्म इंडस्ट्रीतील निर्मात्यांकडे ड्राइव्हरचे काम करणारा ‘हा’ व्यक्ती पुढे बनला बॉलीवूडचा कॉमेडी किंग

जाणून घ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत महालक्ष्मीची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीबद्दल

श्रीदेवीच्या लाईव्ह शो दरम्यान धर्मेंद्रने दारु पिऊन केला होता तमाशा कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.