भारत सामना हारला ही गोष्ट सहन झाली नाही; म्हणून अभिनेत्याने गमावला होता जीव

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत. जे मोठ्या पद्यावर खुप कमी वेळ दिसले. पण त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. या कलाकाराचे नाव म्हणजे शफी इनामदार.

शफी इनामदारने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाने त्यांना खुपच कमी वेळात प्रसिद्धी मिळवून दिली होती. शफी इनामदारने अनेक चित्रपटांमध्ये पोलिसांची भुमिका निभावल्या आहेत. म्हणून त्यांना पोलीस ऑफिसरची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.

शफी इनामदारचा जन्म २३ ऑक्टोबर १९४५ ला झाला होता. १९८० मध्ये त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली होती. ‘विजेता’ चित्रपटापासून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अर्ध सत्य’ चित्रपटापासून त्यांना खरी ओळख मिळाली होती.

अर्ध सत्य चित्रपटामध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भुमिका निभावली होती. त्यांच्या या भुमिकेला लोकांनी खुप जास्त पसंत केले होते. शफी यांची खासियत म्हणजे त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये सर्वाधिक भुमिका पोलीस इन्स्पेक्टरच्या भुमिका निभावल्या आहेत.

चित्रपटांमध्ये शफीने कधीही मुख्य अभिनेत्याच्या भुमिका निभावल्या नाहीत. पण त्यांनी त्यांच्या सहाय्यक भुमिकांनी प्रेक्षकांनी मने जिंकून घेतली. सहाय्यक भुमिकेत असले तरी त्यांचा अभिनय मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना मागे टाकायचे.

शफी इनामदारने दोन दशक फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले. त्यांनी जुल्म, इजतदार, क्रांती, शक्ती, यशवंत, अकेले हम अकेले तुम यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयामूळे त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर यायच्या.

‘यशवंत’ हा शफी इनामदारचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी नाना पाटेकरसोबत काम केले होते. फक्त मोठ्या पद्यावरच नाही तर त्यांनी टेलिव्हिजनवर देखील काम केले होते. ९० च्या दशकातील प्रसिद्ध शो ‘ये जो है जिंदगी’मध्ये त्यांनी निभावलेल्या भुमिकेला लोकांनी खुप पसंत केले होते.

त्यासोबतच त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. अभिनयासोबतच शफीला क्रिकेटचे देखील खुप वेडं होते. शफी भारताचा प्रत्येक सामना आवर्जून बघायचे. १३ मार्च १९९६ मध्ये वर्ल्ड कपचा भारत विरोधात श्रीलंकाचा सामना सुरू होता.

या सामन्या दरम्यान शफी इनामदारला हृदय विकाराचा झटका आला. ज्यामुळे त्यांचे निधन झाले. असे बोलले जाते की, भारत तो सामना हारला. ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही आणि म्हणून त्यांना झटका आला. त्यामुळे त्यांचे निधन झाले.

शफी इनामदारच्या निधनामूळे बॉलीवूडला खुप मोठा धक्का बसला होता. फिल्म इंडस्ट्रीने अतिशय उत्तम अभिनेता गमवला होता. पण आजही लोकं शफीला फिल्मी इन्स्पेक्टर म्हणून ओळखतात. त्यांना इन्स्पेक्टर म्हणून ओळख मिळाली आणि आजही लोकं त्यांच्या भुमिकांचे कौतुक करतात.

हे ही वाचा –

सलग ९ चित्रपट गोल्डन जुबली; जाणून घ्या दादा कोंडकेबद्दल माहीती नसलेल्या गोष्टी

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

…म्हणून प्रियंका चोप्राने दोन चित्रपटांनंतर सलमान खानसोबत काम केले नाही

शेवटच्या दिवसांमध्ये स्वत:च्याच घरासाठी चढावी लागली कोर्टाची पायरी; खुपच वाईट होता अभिनेत्री साधनाचा शेवट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.