‘मोदींनी देशाची तर वाट लावली, पण जनतेलाही मरण्यासाठी सोडून दिले आहे; अभिनेत्याची जहरी टिका

मुंबई | देशात कोरोनाने वर्षभरापासून थैमान घातले आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थीवरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

देशात वाढत्या रुग्णसंखेमुळे बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता कमाल खान याने मोदींवर हल्लाबोल केला आहे.

कमाल खान म्हणाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत बोलत असतात की देशात ७० वर्षात जे झालं नाही ते मी करून दाखवणार. मोदींनी करून दाखवलेच. देशाला बर्बाद केले आहे. त्याचबरोबर देशातील लोकांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले. यामध्ये जास्त भक्त आहेत. असं अभिनेता कमाल खान म्हणाला आहे.

कोरोनामुळे देशात फार भयंकर परिस्थीती निर्माण झाली आहे. देशातील नागरीकांचा उपचारा अभावी मृत्यू होत आहे. देशात फार गंभीर चित्र दिसत आहे. यामुळे संपुर्ण देशात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

दरम्यान  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर  १ कोटी ६९ लाख कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या २४  तासात देशात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण सापडले आहेत. तर २,७६७ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

 सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कलाकारांवर नवाजुद्दीन सिद्दीकी भडकला

नवाजला सेलिब्रिटींच्या सुट्टी आणि तिथून शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, लोकांकडे खायला अन्न नाहीये, त्यामुळे सुट्टयांमध्ये पैसे उडवणाऱ्या सेलिब्रिटींना लाज वाटली पाहिजे, असे नवाजने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
देशात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात भाजप आणि काँग्रेसच्या ३ आमदारांचा मृत्यू
त्यांना लग्नात खूप अडचणी आल्या, त्यातूनच त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करून केली करोडोंची कमाई
महाराष्ट्रदिनी राज्याला मिळणार मोफत लसींचं मोठं गिफ्ट; अजित पवारांनी दिले संकेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.