परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी

बॉलीवूड चित्रपट खलनायकांशिवाय अपूर्ण आहेत. चित्रपटामध्ये खलनायक नसेल तर तो चित्रपट बिना मिठाच्या भाजीसारखा वाटतो. चित्रपट बिग बजेट असो किंवा स्मॉल बजेट त्यात खलनायक मात्र चित्रपटामध्ये असतोच. त्यांचा अभिनय आणि दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आजपर्यंत आपण हिंदी चित्रपटांमध्ये अनेक देसी खलनायक बघितले आहे. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधल्या विदेशी खलनायकांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत आणि आजही त्यांनी निभावलेल्या भुमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

१ बॉब क्रिस्टो – बॉलीवूडच्या विदेशी खलनायकांमध्ये सर्वात पहीले नाव बॉब क्रिस्टोचे येत. आज भलेही लोकं त्यांना ओळखत नसले. तरी एक काळ असा होता. जेव्हा बॉबने हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.

८० आणि ९० च्या दशकामध्ये बॉब क्रिस्टो खलनायकाचे दुसरे नाव होते. परवीन बाबीला भेटण्यासाठी मुंबईला आलेले बॉब नेहमीसाठी मुंबईचे झाले. १९८० मध्ये बॉब कुर्बानी चित्रपटामध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भुमिका केल्या. त्यामूळे प्रेक्षक बॉबला गोरा सैतान बोलू लागले होते. आजही बॉबच्या भुमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.

२ गैविन पैकर्ड – ९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये एका विदेशी खलनायकाने गोंधळ केला होता. गैविन फक्त अभिनेतेच नव्हते. तर त्यासोबतच ते हैंडसम आणि बॉडी बिल्डर देखील होते. त्यामूळे तरुणी त्यांच्या प्रेमात पडायचे. तर दुसऱ्या सेंकदाला त्यांचा अभिनय बघून चिडायच्या.

गैविनने सडक, करण अर्जून आणि मोहरा सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करुन खलनायकाची वेगळी ओळख निर्माण केली. गैविनचा जन्म मुंबईत झाला होता. त्यामूळे त्यांना हिंदी चांगली येत होती. गैविनची बॉडी बघून बॉलीवूडचे अभिनेते पागल झाले होते. पुढे जाऊन गैविनने सलमान खान, सुनील शेट्टीसारख्या अभिनेत्यांनी बॉडी बिल्डींगची ट्रेनिंग दिली होती.

३ पॉल ब्लैकथॉर्न – लगान चित्रपट तर सर्वांना लक्षात आहेच. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर राज्य केले. त्यासोबतच भारतातील प्रेक्षकांच्या मनावर देखील राज्य केले. या चित्रपटातील हिरोसोबतच लोकं खलनायकाला देखील विसरु शकले नाहीत.

पॉल ब्लैकथॉर्नने लगान चित्रपटामध्ये खलनायकाची भुमिका निभावली होती. त्यांचा दमदार अभिनय पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. आजही प्रेक्षक पॉलची भुमिका विसरु शकले नाहीत.

४ सज्जाद डेडलाफ्रूज – सज्जादने एकाच चित्रपटात खलनायकाची भुमिका निभावली आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. सज्जादने सलमान खानच्या टाइगर जिंदा है चित्रपटामध्ये अबू उस्मानची भुमिका केली होती. सज्जाद ईरानी आहेत. त्यांनी खुपच प्रभावित करणारी भुमिका साकारुन प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, रणबीर कपूरनंतर विक्की कौशलवर फिदा झाली कतरिना; लवकरच करणार लग्न?
एकेकाळी सलमान माझे कपडे बूट संभाळत होता, माझ्यामुळेच त्याला काम मिळाले; मोठ्या अभिनेत्याचा खुलासा
टेलिव्हिजनवरील जोधा बाई आज दिसते ‘अशी’; ओळखणे झाले आहे कठिण
९० च्या दशकातील ती प्रसिद्ध आई जिने एकदा केली होती फक्त दोन वर्ष छोट्या हिरोच्या आईची भुमिका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.