‘तसले’ सिनेमे करण्यापेक्षा मी एखाद दुकान टाकून सामान विकेल म्हणणाऱ्या हिरोवर काय दिवस आलेत बघा

बॉलीवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत. ज्यांना रातोराम फेम मिळाले होते. अभिनेता प्रियांशू चॅटर्जी देखील अशाच चेहऱ्यांपैकी एक आहे. एक काळ असा होता ज्यावेळी प्रियांशू त्याच्या प्रेम कहानीमूळे इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असायचा. पण आत्ता मात्र हा चेहरा लाइमाईटपासून खुप दुर आयूष्य जगत आहे.

अभिनेता प्रियांशू चॅटर्जी ४८ वर्षांचा झाला आहे. २० वर्षांपूर्वी ‘तुम बिन’ चित्रपटातून प्रियांशूने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातून त्याला खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती. तो त्याच्या लुक्समूळे आणि रोमॅंटिक अंदाजाने मुलींमध्ये खुप जास्त प्रसिद्ध झाला होता.

त्याला पहील्याच चित्रपटानंतर प्रियांशूला चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्याच्यावर सामान्य मुलींसोबतच फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री देखील फिदा झाल्या होत्या. अनेक अभिनेत्रींचा तो क्रश झाला होता.

एकेकाळी लाखो मुलींच्या मनावर राज्य करणारा ४८ वर्षांचा प्रियांशू आज लाइमलाईटपासून दुर आयूष्य जगत आहे. दिल्लीमध्ये जन्मलेल्या प्रियांशूने कॉलेजच्या दिवसापासून मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्याचे लुक्स बघून त्याला चित्रपटांच्या ऑफर यायला सुरुवात झाली.

प्रियांशूने तुम बिन चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पहील्याच चित्रपट सुपरहिट झाल्यामूळे तो स्टार झाला होता. या चित्रपटातून राकेश बसेल, सिंदली शर्मा, हिंमाशू मलिकने देखील बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण सर्वात जास्त ओळख प्रियांशूला मिळाली होती.

प्रियांशूने इंडस्ट्रीमध्ये रोमॅंटिक अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यानंतर प्रियांशूला ऐश्वर्या रायसोबत ‘दिल का रिश्ता’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ही त्याच्यासाठी खुप मोठी संधी होती. त्याने चित्रपटामध्ये ऐश्वर्याच्या पतीची भुमिका साकारली होती.

प्रियांशूने त्याच्या करिअरमध्ये २५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात पिंजर, भुतनाथ, जुली, कोई मेरे दिल मैं हैं, चिंटू अशा अनेक चित्रपटांचा समावेश होतो. गेल्या वर्षी विधू विनोद चोप्राच्या शिकारा चित्रपटामध्ये देखील त्याने काम केले. त्याने कमी चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याचे सर्व चित्रपट खुपच चांगले होते.

प्रियांशूची इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री तर खुप धमाकेदार झाली होती. पण त्यानंतर मात्र त्याचे चित्रपट काही खास जादू करु शकले नाहीत. गेले २० वर्ष प्रियांशू फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. पण वेळेनूसार त्याची प्रसिद्ध कमी झाली आणि त्याला काम मिळणे बंद झाले.

प्रियांशू बॉलीवूडमध्ये जास्त काळ टिकू शकला नाही. २०१० नंतर प्रियांशू काही छोट्या चित्रपटांमध्ये दिसला. बॉलीवूडमध्ये जास्त यश मिळाले नाही.म्हणून त्याने बंगाली चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिकडे देखील त्याला काही खास यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र तो इंडस्ट्रीतून गायब झाला.

प्रियांशूचे म्हणणे आहे की, इंडस्ट्रीमध्ये त्याच्या टॅलेंटचा नीट वापर झाला नाही. आपल्या करिअरबद्दल बोलताना प्रियांशू म्हणाला होती की, चांगली स्क्रिप्ट असेल तरच मी चित्रपट साईन करेल. मला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर आल्या नाहीत. म्हणून मी जास्त चित्रपट केले नाहीत. वाईट चित्रपट करण्यापेक्षा मी एखाद दुकान टाकून सामान विकेल.

एका मुलाखतीमध्ये प्रियांशूने त्याच्या पहील्या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला होता. तो म्हणाला होती की, माझा पहीला चित्रपट सुपरहिट झाला होता. त्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी त्यातून करोडो रुपये कमवले होते. पण मला त्या चित्रपटासाठी योग्य फिस मिळाला नव्हती. प्रसिद्धीच्यामानाने मला खुप कमी पैसे मिळाले होते.

एकेकाळी अनेकांच्या मनावर राज्य करणारा प्रियांशू आज लाइमलाईटपासून दुर आहे. त्याच्या वैयक्तिक आयूष्यातही अनेक अडचणी आहेत. ४८ वर्षांचा प्रियांशू आजही सिंगल आहे. १९९८ मध्ये त्याने मॉडेल आणि अभिनेत्री मालिनी शर्मासोबत लग्न केले होते.

पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. दोघे वेगळे झाले. प्रियांशू आजही सिंगल आहे. त्याला एखाद्या चांगल्या चित्रपटाची ऑफर मिळाली तर तो नक्कीच परत एकदा इंडस्ट्रीमध्ये काम करायला तयार आहे. तो चांगल्या स्क्रिप्टची वाट बघत आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या रेखा आणि बिजनेस मॅन मुकेश अग्रवालच्या लग्नाचे सत्य

हमारी अधूरी कहानी! वाचा किंग ऑफ रोमान्स यश चोप्राची अधूरी प्रेम कहानी

‘ही’ आहे जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी; सुंदरतेमध्ये देते मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर

शालूचा अदांनी चाहते घायाळ; सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.