बाॅलीवूडला धक्का! प्रसिद्ध अभिनेता आसिफ बसराची कुत्र्याच्या पट्ट्याने फाशी लाऊन आत्मह.त्या

धर्मशाळा । बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता आसिफ बसरा याने हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा येथे गळफास लावून आ.त्महत्या केली. जोगिबाडा रोडवरील एका कॅफेमध्ये त्याने गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून तो तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. आसिफ बसरा आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेला होता. घरी आल्यानंतर आपल्या या कुत्र्याच्या पट्ट्याने त्याने गळफास घेतला. आसिफ हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे कळते.

आसिफ बसरा एक लोकप्रिय चेहरा होता. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. परजानिया, ब्लॅक फ्राईडे या सिनेमात त्याने काम केले होते. हॉलिवूड सिनेमा ‘आऊटसोर्स’मध्येही तो दिसला होता. इमरान हाश्मीच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात त्याने इमरानच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

आसिफ गेल्या 5 वर्षांपासून मक्लोडगंजच्या एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत एक विदेशी महिला सुद्धा राहत होती. या महिलेसोबत आसिफ लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची चर्चा आहे.

हे वर्ष बॉलीवूडसाठी मोठे नुकसान देणारे ठरले आहे. यावर्षी अनेक कलाकारांचा मृत्यू झाला असून, अनेकांनी आ.त्महत्या देखील केल्या आहेत. आता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.