‘अपना टाइम आयेगा’ गाण्यावर अंकिता लोखंडेचा अप्रतिम डान्स; पाहायला मिळतोय अभिनेत्रीचा ‘स्वॅग’

छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहचली. या मालिकेमुळेच तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर तिने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत अर्चना पत्रातील साधी आणि सोज्वळ अंकिता वयक्तिक आयुष्यात तेवढीच ग्लॅमरस आणि खोडकर आहे.

अंकिताने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मस्तीच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये ती ‘अपना टाइम आयेगा’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तिने ग्रे कलरचे जाकेट आणि ग्रे कलरचे शॉर्टस घातले आहेत. ती अंत्यंत खोडकररित्या डान्स करत आहे. यावर अभिनेत्री अभिज्ञा भावेने कमेंट केली की, ‘मी कुठे होते?’ तर पार्थना बेहेरेने कमेंट केली की, ‘लव्ह यू वेडे’. तिचा हा अंदाज सर्वांनाच फार आवडला आहे.

अंकिता लोखंडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या ‘पवित्र रिश्ता २.०’ ची शुटींग सुरु आहे. या मालिकेत मानवच्या भूमिकेत अभिनेता शाहीर शेख काम करताना पाहायला मिळत आहे. तसेच माहिती नुसार अभिज्ञा भावे देखील दिसणार आहे.

अंकिताने ‘पवित्र रिश्ता २.०’ बद्दलची माहिती आपल्या सोशल मिडिया अकाऊट वरून आपल्या चाहत्यांना दिली होती. या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये मानवच्या भूमिकेत सुपरस्टार सुशांत सिंग राजपूत याने काम केले होते. त्याची मानवची भूमिका प्रचंड गाजली होती.

अंकिताबाबत बोलायचे झाले तर तिने मनिकर्णिका या चित्रपटात काम केले. तसेच तिने ‘बागी २’ मध्ये काम केले आहे. या चित्रपटात तिने श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख अश्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे.

हे ही वाचा-

विमानतळ हस्तांतरणाचा ठराव कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग आंदोलन कशाला?’

पिंपरीतील अन्वीला रोहित पवारांचा मदतीचा हात; उपचाराचा निधी उभारण्यासाठी लोकांना केली विनंती

महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.