तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर कार्यकर्ते पोहोचले चक्क जिवंत मासे घेऊन? काय आहे यामागचे कारण?

सध्या बिहारमध्ये वातावरण तापलेले आहे. यावेळी कोणता पक्ष बाजी मारणार यावर सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये तेजस्वी यादव चर्चेचा विषय ठरत आहेत. तेजस्वी यादव जर बिहारचे मुख्यमंत्री झाले तर ते बिहारचे सगळ्यात युवा मुख्यमंत्री बनतील.

त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या खूप उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या घराबाहेरच एक फोटो आणि व्हीडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. कारण त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते चक्क जिवंत मासे घेऊन थांबले आहेत.

पण यामागचे नेमके कारण काय आहे? कार्यकर्ते मासे घेऊन का थांबले आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला होता. बिहार, पश्चिम बंगालमध्ये माशाला एक वेगळे महत्व आहे. कुठलेही शुभ कार्य करण्याच्या आधी येथे माशाला पाहतात. आणि ते ही जिवंत मासा.

माशाला पाहिले तर आपला दिवस शुभ जातो असे मानतात. बिहार विधानसभा निवडणुकीत राघोपूर मतदारसंघावर देशभरातील लोकांच्या नजरा आहेत. राघोपुरमध्ये सध्या तेजस्वी यादव आघाडीवर आहेत.

तेजस्वी यादव यांच्या विरोधात भाजप उमेदवार सतीश कुमार यादव सध्या रिंगणात आहेत. त्यामुळे तिथे चुरशीची लढाई होताना पहायला मिळत आहे. दरम्यान, बिहारच्या निवडणूकीचे निकाल आज दुपारपर्यंत समोर येतीलच.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.