मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. काल मुंबई पोलिसांकडून मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेण्यात आले होते.(Action will be taken against Sandeep Deshpande, Instructions given by the Minister of State for Home Affairs)
त्यानंतर आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिस आले होते. त्यावेळी पोलिसांना चकवा देत संदीप देशपांडे यांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही. यावेळी झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस अधिकारी जखमी झाली होती.
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. “मनसेचे नेते श्री. संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय पांडे यांना दिले आहेत”, असं ट्विट गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस कालपासून मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शोध घेत होते. आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत मनसे नेते संतोष धुरी देखील होते. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले आणि त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस अधिकारी संदीप देशपांडे यांना पोलीस व्हॅनकडे घेऊन जात होते. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे घुमजाव करत पोलिसांना त्यांच्या गाडीकडे घेऊन गेले. त्यानंतर संदीप देशपांडे गाडीत बसून त्या ठिकाणाहून निसटले.
महत्वाच्या बातम्या :-
भारती सिंहने पुन्हा दिली खुशखबर; म्हणाली, मी एकटी नाही तर हर्षही याला जबाबदार आहे…
उर्वशी रौतेलाच्या शॉर्ट स्कर्टने दिला धोका, झाली ऊप्स मोमेंटची शिकार, पहा व्हिडीओ
..त्यामुळे मोदी फ्रान्सला जाण्यापूर्वीच तेथील कंपनीने भारतासाठी पाणबुडी तयार करण्यास दिला नकार