मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर होणार कारवाई.? आव्हाडांनी दिला काळ्याबाजाराचा पुरावा

मुंबई । राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनावरून राजकीय वातावरण तापले आहे. या इंजेक्शनाचा मोठा तुटवडा राज्यात जाणवत आहे. आता या इंजेक्शनाचा साठा सापडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीला ताब्यात घेतले होते.

यावरून राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका वृतपत्राचे कात्रणच ट्वीट केले आहे. यात ब्रुक फार्मा कंपनीवरच रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आव्हाड यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. ब्रुक फार्मा या कंपनीचे साठेबाजी करणे आणि औषधे काळ्या बाजारात विकणे त्यांचा धंदा जोरात आहे. आव्हाडांनी याबाबत पुरावा दिल्याने आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. संचालकास ताब्यात घेतले होते, तेव्हा पोलीस आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.

गुजरातमध्येच त्यांच्यावर केस झाली आहे, तसेच महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावे याची गरज आहे. हे लहान पोरांसारखे माझ चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल, असा टोलाही आव्हाड यांनी भाजपला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाला लागणारे रेमडेसीवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. याचा मोठा काळा बाजार देखील केला जात आहे. अनेकांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.