राममंदीर निधीच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर शासनाची कारवाई; दिली ‘ही’ शिक्षा

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे राम मंदीर निधी कार्यक्रमाच्या रॅलीत हातात भगवा झेंडा घेऊन डान्स करणे पोलिस उपनिरिक्षकाच्या अंगलट आले आहे. याबाबत पोलिस उपनिरिक्षक हनुमंत गायकवाड यांची बदली करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

हदगाव येथे डिजे लावून हातात भगवे झेंडे घेऊन मिरवणुक निघाली होती. राम मंदिर निधी कार्यक्रमाची ही रॅली होती. ऑन ड्युटी असलेले पोलिस उपनिरिक्षक हनुमंत गायकवाड यांना डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट डिजेच्या तालावर मिरवणुकीत सहभागी तरूणांसोबत डान्स करायला सुरूवात केली.

पोलिस उपनिरिक्षक गायकवाड साहेबच आपल्यासोबत डान्स करायला सहभागी झालेत म्हटल्यावर  तरूणांनी त्यांना खांद्यावर घेतले आणि मग हातात भगवा झेंडा घेऊन हनुमंत गायकवाड यांनी नथ मोत्याची नाका मधी गं अंबा… या गाण्यावर बेभान डान्स केला.

डान्सचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर गायकवाड यांच्यावर टिका करण्यात येत होती. त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर चौकशी करून पोलिस उपनिरिक्षक हनुमंत गायकवाड यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सरकारने रायगडावर केलेल्या ’त्या’ गोष्टीवरून संभाजीराजे भडकले; म्हणाले हा तर काळा दिवस..
काय सांगता! पंतप्रधान मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार
राम मंदीर कार्यक्रमातील वाद जीवावर बेतला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घूण ह.त्या

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.