साकीनाका बलात्काराचा तपास करण्यासाठी जोत्सना रासम यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे जोत्सना रासम

मुंबईच्या साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. तिला रुग्णालायत दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.

याबाबतची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. आता या घटनेचा तपास करण्यासाठी एसीपी जोत्सना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच यासाठी जोत्सना रासम यांना एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.

जोत्सना यांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यांचा तपास लावला आहे. त्यामध्ये मुद्रांक घोटाळ्यातील तपास, अभिनेत्री रेश्मा उर्फ लैला खान हत्या प्रकरण, २०११ साली हैद्राबादहून मुंबईला तस्करी करण्यात आलेले १ कोटी ४५ लाख किमतीचे हिरे आणि सोन्याच्या मुद्देमालासह आरोपींना हस्तगत करणे अशा प्रकारणांचा तपास त्यांनी लावला आहे.

तसेच दुबईच्या रोशन अन्सारीच्या मुसक्या आवळणे, इतकेच नाही, तर मर्दानी चित्रपटासाठी राणी मुखर्जीला ट्रेनिंगही जोत्सना यांनीच दिली होती. तसेच धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणात जबाब नोंदवून घेण्याचे कामही जोत्सना रासम यांनीच केले होते.

रासम या २७ वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाल्या होत्या. सध्या त्या सहाय्यक आयुक्त म्हणून राज्य गुप्तचर विभागात कार्यरत आहे. या २७ वर्षांमध्ये त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास उघड केला आहे.

दरम्यान, जोत्सना रासम यांनी आपले नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले आहे. भ्रृणहत्येच्या विरोधात त्यांनी ११ दिवसांमध्ये १३ राज्यांमध्ये ६५८० किलोमीटरचा प्रवास कारने केला होता, त्यामुळे फास्टेस्ट वूमन म्हणून त्यांचे नाव नोंदवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा लढणार
अशा नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यायला पाहिजे: साकीनाका प्रकरणावरुन अमृता फडणवीस भडकल्या
खुशखबरः! सरकारकडून मिळणार १५ लाख… जाणून घ्या नेमकी काय आहे योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.