समृद्धी महामार्गावर सोमवारी सायंकाळी ५ वाजता लासूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातात सहा जणांचा जीव थोडक्यात वाचला. काल अतिवेगामुळे घडलेल्या या अपघातात सहा जीव मरता मरता वाचले. समृद्धी महामार्गावरील अतिशय भयानक असा हा अपघात होता.
कारने नागपूरकडे जाणारा रस्ता ओलांडून चार कोलांट्याउड्या घेत विरुद्ध दिशेने जाऊन धडक दिली. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी जखमींना मदत केली. या कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले.
एक आलिशान चारचाकी (एमएच 31 ईके 1362) शिर्डीहून नागपूरकडे जात होती. कारमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दोन मुले होती. हे सर्व लोक समृद्धी महामार्गाने नागपूरला जात होते. त्यांच्यासोबत दुसरी गाडी होती.
गाडी पुढे जाऊ लागल्यानंतर पाठीमागून धावणाऱ्या कारच्या चालकाने जोरात गाडीला दामटण्यास सुरुवात केली. लासूर स्थानकाच्या पुढे जात असताना पोटुलजवळ भरधाव वेगामुळे कारचे टायरड फुटले. त्यामुळे कार नागपूरच्या दिशेने रस्ता ओलांडून शिर्डीच्या दिशेने रस्त्यावर चार वेळा पलटी झाली.
या भीषण अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही ही चांगली बाब आहे. तर सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी महामार्ग सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.
जखमींवर तातडीने अॅम्ब्युलन्समध्ये उपचार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही घटना पाहण्यासाठी धाव घेतल्याचे दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
20 वर्षीय अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच खोलली शर्टाची बटणे, मग करू लागली असे काही की पाहणारे झाले शाॅक
“दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार”
हे काय भलतंच ! सोलापूरच्या आजोबांना मिळेना शांतता, ४६ वर्षांत केले तब्बल ८५ लग्न