अपघात (Accident): पिकअप व्हॅनमध्ये विद्युतप्रवाह पसरून १० जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पश्चिम बंगालमधील कुचबिहारमध्ये घडली आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली असल्याचे दिसून आले आहे. ही व्हॅन जल्पेशला प्रवाशांना घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. (Accident, Lightning, West Bengal, Mekhliganj Police Station,)
एएनआय या वृत्त्संस्थेच्या माहितीनुसार, या व्हॅनमध्ये डीजे सिस्टिमकरिता जनरेटर लावण्यात आले होते. या जनरेटरच्या वायरींगमुळे विद्युत प्रवाह पसरून ही घटना घडली असल्याचे आढळून आले आहे. वाहनामध्ये एकूण २७ लोकं होते. त्यातील १६ जण जखमी झाले असून १० लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
जखमी झालेल्या १६ जणांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेखलीगंज पोलीस स्थानक परिसरातील धरला ब्रिजवर ही घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजता पिकअपमध्ये वीजप्रवाह पसरून ही घटना घडली असल्याचे माथाभंग येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी सांगितले. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.
डीजे जनरेटर वाहनाच्या मागील बाजूस ठेवण्यात आले होते. त्यातून संपूर्ण वाहनामध्ये विद्युत प्रवाह पसरला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.
दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण वाहनामध्ये वीजप्रवाह पसरला होता. या अपघातात अनेकजण गंभीररित्या भाजले गेले आहेत. तसेच १० लोकं अक्षरशः मृत्यमुखी पडले आहेत. जखमी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंकडून दिग्गज नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; एक कोकणाचा तडफदार चेहरा तर दुसरा विदर्भाची शान
Tanushree Dutta: तनुश्री दत्ताने पुन्हा नाना पाटेकरांवर केले खळबळजनक आरोप, म्हणाली, मला काही झालं तर
Sanjay Raut: “संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं, आता ते त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत”